मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय, चार मंत्र्यांची नावं निश्चित

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गेले काही दिवस महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर रोज चर्चा होत आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण मागे घेतलं असलं तरी देखील आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी राज्यभर दौरा करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जम्मू कशमीरमध्ये कामासाठी गेले होेते त्यामुळे आज शिष्टमंडळ जरांगे यांच्यासोबत आरक्षणाबाबत चर्चा करायला जाणार आहेत.

मराठा आरक्षण आणि कुणबी या दोन जातींच्या प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारने शिष्टमंडळांना पाठवलं आहे. यासाठी चार मंत्र्यांची नावेही निश्चित केली आहेत. माध्यमांच्या माहितीनूसार आज संध्याकाळपर्यंत चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार आहे.

कोणत्या चार शिष्टमंडळांना चर्चेला पाठवण्यात आलं?

जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ जाणार आहे. चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. या मंत्र्यांच्या शिष्टमंडळात उदय सामंत, शंभूराजे देसाई, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे यांचा समावेश आहे. जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आजच शिष्टमंडळ रवाना होणार आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, सोमवारी एक शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला येणार असल्याची माहिती खुद्द जरांगे यांनी दिली होती. मात्र, काही कारणास्तव शिष्टमंडळाचा हा दौरा रद्द झाला होता.

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार इतक्या रुपयांचा लाभ!

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ‘या’ नेत्याची वर्णी

“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!