‘हा’ माजी मंत्री अडचणीत; राजकारणात खळबळ

मुंबई | आर्थिक गुन्हे शाखेने गोव्यातील रिअल इस्टेट कंपनी आणि तिच्या तीन संचालकांविरुद्ध 14 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यापैकी कंपनीचे एक संचालक सुरेश परुळेकर गोव्यातील माजी मंत्री आहेत. यामुळे गोव्याच्या राजकारणात खळबळ माजलीये.

मुंबईतील ताडदेव पोलिस ठाण्यात सुरेश परूळेकर यांच्यासह प्रसाद परूळेकर आणि मंदा परूळेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गोव्यातील डिचोली येथील रहिवासी असलेल्या प्रेमचंद गवस यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गवस यांनी जानेवारी 2008  ते फेब्रुवारी 2023 या काळात परुळेकर यांना नियमित हप्त्यांमध्ये 14 कोटी 90लाख रुपये दिले होते.

आरोपींनी जमिनीच्या सुरळीत खरेदीसाठी तयार केलेल्या पॉवर ऑफ ॲटर्नीमध्ये काही फेरफार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

जमिनीचा व्यवहार ताडदेव येथील बेसाईड मॉलमधील कार्यालयात झाल्यामुळे याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

अटक चुकविण्यासाठी परुळेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला नसल्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी मुंबईहून पोलिस पथक गोव्यात दाखल झाले आहे.

परुळेकर यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा असे तिघेही या कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे तिघेही कायद्याच्या कात्रीत सापडले असून, तिघांनाही मुंबई पोलिस अटक करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

येत्या 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस 

पाडव्याला गोविंद बागेत जाणार?; अजित पवारांनी स्वत:च सांगितलं 

पोलीस दलात खळबळ!, फिल्मी स्टाईल घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार इतक्या रुपयांचा लाभ!