Preity Zinta | बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ पाच वर्षांनी करणार कमबॅक?; ‘या’ अभिनेत्यासोबत दिसणार मोठ्या पडद्यावर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Preity Zinta | बॉलीवुडची ‘डिंपल गर्ल’ प्रीति झिंटा आणि अभिनेता सनी देओलच्या चाहत्यांसाठी मोठी माहिती समोर आली आहे. या दोन्ही स्टार्सला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. प्रीती झिंटाने (Preity Zinta ) एकेकाळी आपल्या डिंपलने तरुणांना घायाळ केलं आहे. बऱ्याच वर्षांपासून ती सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे. त्यामुळे ती पुन्हा कधी पुनरागमन करणार?, याची चाहत्यांना प्रतिक्षा होती. अखेर तो दिवस उजाडला आहे.

अभिनेता सनी देओल आणि प्रीती झिंटा लवकरच एका मोठ्या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. दोघेही स्टार्स त्यांच्या आगामी ‘लाहौर 1947’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.’गदर 2’च्या यशानंतर सनी देओलचा हा मोठा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग अद्याप सुरू झालेलं नाही. मात्र, या चित्रपटाची आतापासूनच चर्चा होत आहेत.

Preity Zinta कमबॅक करणार-

काही दिवसांपूर्वीच सनी देओल ‘सफर’ चित्रपटाचे शूटिंग करताना दिसला होता. आता म्हटले जातेय की, लवकरच त्याचा दुसरा चित्रपट ‘लाहोर 1947’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावर लवकरच काम सुरू होईल, असे सांगितले जात आहे. हा चित्रपट अभिनेता आमिर खान प्रोड्यूस करणार आहे.

सनी आणि प्रीती (Preity Zinta ) यांचा ‘लाहौर 1947’ हा चित्रपट एक पीरियड ड्रामा असणार आहे. यामध्ये सनी देओल आणि प्रीती झिंटा यांची मुख्य भूमिका असणार आहे. या चित्रपटासाठी राजकुमार संतोषी आणि आमिर खान देखील एकत्र काम करत आहेत. मात्र, अद्याप याची अधिकृत अशी कोणतीच घोषणा करण्यात आली नाही.

सनी देओल आणि प्रीती झिंटा दिसणार एकत्र

कालच (24 जानेवारी) प्रीती झिंटाला मुंबईतील एका स्टुडिओ बाहेर स्पॉट करण्यात आले. रिपोर्ट्सनुसार ‘लाहौर 1947’ च्या लुक टेस्टसाठी ती स्टुडिओमध्ये पोहोचली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रीती या चित्रपटाद्वारे पुन्हा कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे.

सनी आणि प्रीतीने सोबत ‘हिरोः लव स्टोरी ऑफ अ स्पाई’, ‘फर्ज’ आणि ‘भैयाजी सुपरहिट’ यासारख्या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. ‘लाहोर 1947’ हा आमिर खान आणि संतोषी यांचा रीयूनियन चित्रपट असणार आहे. दोघांनी ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात शेवटच्या वेळी एकत्र काम केले होते. याशिवाय संतोषी आणि सनी देओलने यापूर्वी ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘घातक’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यामुळे सनी आणि प्रीती आता या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत.

News Title-  Preity Zinta will make a comeback

महत्त्वाच्या बातम्या –

Alia Bhatt च्या साडीवर ‘रामायण’, रणबीर कपूरच्या शालची किंमत लाखोच्या घरात

लोकसभा निवडणुकीनंतर Rahul Gandhi यांना अटक होणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Kangana Ranaut हुबेहुब इंदिरा गांधींसारखी दिसते; ‘Emergency’ मधील झलक, रिलीज डेट जाहीर

संदीप राऊत हाजीर हो…! Sanjay Raut यांच्या भावाला ईडीची नोटीस; प्रकरण काय?

ACB ची मोठी कारवाई! सरकारी अधिकाऱ्याकडे सापडली 100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता