अग्रवालांनी ड्रायव्हरला डांबून ठेवलं!, धक्कादायक घटनाक्रम आला समोर; पोलिसांकडून आता आजोबाला अटक

Pune Accident News | पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agrawal) यांना देखील आता पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सुरेंद्र अग्रवाल यांचा मुलगा विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) पोलीस कोठडीत आहे, तर त्यांचा नातू आणि या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात आहे. त्यामुळे अग्रवालांच्या घरातील तिन्ही पिढ्या आता तुरुंगात आहेत.

आजोबांना का केली अटक?-

सर्वात प्रथम नातू, नंतर मुलगा आणि आता आजोबा सुरेंद्र अग्रवाल अशा अग्रवालांच्या तिन्ही पिढ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरेंद्र अग्रवालांना अटक झाल्याने या प्रकरणाची आता नव्याने चर्चा सुरु झाली आहे. या दरम्यान पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांना का अटक केली याचं कारण सुद्धा समोर आलं आहे. 

आरोपी अग्रवाल कुटुंबाकडून अपघातादरम्यान (Pune Accident News) गाडी ड्रायव्हर चालवत होता, असा दावा करण्यात आला होता. पोलिसांनी मात्र गाडी अल्पवयीन आरोपीच चालवत होता, असा दावा केला आहे. या दोन्ही दाव्यांदरम्यान एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे. ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे आणि याच गुन्ह्याच्या अंतर्गतपुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली आहे.

टीका झाल्याने पोलिसांची कडक कारवाई-

कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची गुरुवारी चौकशी करण्यात आली होती. या चौकशीमध्ये आरोपी मुलाला आजोबांनीच चावी दिल्याची कबुली त्यांनी स्वतः दिली होती. आपला नातू अल्पवयीन असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. आपल्या या नातवावर खटला देखील अल्पवयीन म्हणूनच चालवावा, अशी मागणी त्यांनी केली होती. (Pune Accident News)  

दरम्यान, आता या प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ड्रायव्हरला धमकवल्याचा आरोप आहे. तसं पहायला गेलं तर सुरेंद्र अग्रवाल हे पुण्याच्या बांधकाम व्यवसायातील मोठं नाव आहे, मात्र त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा तेवढंच वादग्रस्त राहिलेलं आहे. छोटा राजनशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, तसेच या प्रकरणी एक खटला सुद्धा त्यांच्यावर सुरु आहे. 

ड्रायव्हरला धमकी दिली, डांबून ठेवलं-

अपघात झाल्यानंतर (Pune Accident News) आपल्या अल्पवयीन नातवाला वाचवण्यासाठी ड्रायव्हर गंगाराम पुजारी याचा बळी देण्याचा सुरेंद्र कुमार यांचा डाव होता. त्यांनी त्याला डांबून ठेवलं तसेच पोलीस तपासात योग्य तो जबाब देऊ दिला नाही किंवा तसा प्रयत्न केला, असा गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात अटकेत असलेल्या सुरेंद्र अग्रवाल यांना सुट्टीच्या न्यायालयासमोर दाखल करण्याची शक्यता आहे. विशाल अग्रवालचा यांचा सुद्धा पोलीस पुन्हा ताबा घेणार आहेत, कारण या प्रकरणात त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News Title: Pune Accident News Surendra Agrawal arrest

महत्त्वाच्या बातम्या-

आज या राशीच्या व्यक्तींनी प्रवास टाळावा

डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकावर मोठी कारवाई!

भर स्टेडियममध्ये जान्हवी कपूरसोबत घडला धक्कादायक प्रकार, व्हिडीओ तूफान व्हायरल

पोलीस कॉन्टेबलची पबमध्ये पार्टी; रविंद्र धंगेकरांकडून पोलिसांवर फोटोबॅाम्ब

पुणे अपघात प्रकरणातील सीसीटीव्हीबाबत धक्कादायक खुलासा समोर!