डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकावर मोठी कारवाई!

Dombivli MIDC Blast | काल डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC Blast) कंपनीत अग्नितांडव झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एमआयडीसीच्या आजूबाजूच्या घरांचे मोठं नुकसान झाल्याचं समजतंय. आजूबाजूच्य़ा काही गावांचे नुकसान झालं आहे. या धुरामध्ये लहान बालकांच्या जीवाला धोका आहे. अशातच डोंबिवली येथे उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. अमुदान कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू आणि 65 कामगारांचा मृत्यू

या दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यु झाला आणि 65 अधिक कामगार हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. काल उशीरापर्यंत एनडीएफआरच्या टीमकडून शोधमोहिम राबवण्यात येत होती. आज, शुक्रवारी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आलं. ढिगाऱ्याखाली अनेकजन गाडली गेली होती. (Dombivli MIDC Blast)

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

दरम्यान याचप्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. अमुदान कंपनीच्या मालकावर मोठा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. काल दुपारी झालेल्या बॉयलरच्या स्फोटामुळे भीषण आग लागून दुर्घटना घडली आहे.

NDRF च्या टीमकडून शुक्रवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. बाचाव कार्याच्या पाच गाड्या तेथे दाखल झाल्या. यामध्ये 11 जणांचा जीव गेला आहे. तीन मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. यापुढे अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कंपनीच्या आजूबाजूला असणाऱ्या इमारतीला असणाऱ्या लोखंडी ग्रील दुभंगले आहेत. (Dombivli MIDC Blast)

या आगीची तिव्रता ही दोन किमी अंतरापर्यंत भासत होती. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. जिथे ही घटना घडली यामुळे वायू प्रदर्शन झाल्याचं समजतंय. केमिकल कंपनीतील रसायनांमुळे ही दुर्गंधी पसरली आहे. यामुळे बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे. (Dombivli MIDC Blast)

स्फोटानंतर परिसरात एका बालरुग्णालयाचं काचेचं गेटचा चक्काचूर झाला. रुग्णालयाबाहेर काचेचा खच पडला आहे. यामुळे घर आणि इमारतींचे नुकसान झालं आहे.

News Title – Dombivli MIDC Blast News Update About Number Of Death

महत्त्वाच्या बातम्या

दहावीचा निकाल लवकरच होणार जाहीर! अशाप्रकारे पाहा निकाल

तरुणांना स्वस्तात मस्त असलेल्या या बाईक्सची क्रेझ; जाणून घ्या किंमत

महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाकडे केली सर्वात मोठी मागणी

सोसाट्याच्या वाऱ्यासह राज्यातील ‘या’ भागात पाऊस धुमाकूळ घालणार

राजस्थान विरुद्ध हैदराबाद क्वालिफायर सामन्यात ‘या’ संघाचं वर्चस्व राहणार; पाहा हेड टू हेड