सोसाट्याच्या वाऱ्यासह राज्यातील ‘या’ भागात पाऊस धुमाकूळ घालणार

Weather Updates l सध्या राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे राज्यातील काही बहगत उन्हाचा पार वाढत आहे तर काही भागात पाऊस हजेरी लावत आहेत. मात्र अशातच आता हवामान खात्याने एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढील काही दिवस राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

राज्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता :

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा, कोकणासह विदर्भात पाऊस हजेरी लावणार आहे. मात्र या व्यतिरिक्त राज्यातील इतर काही भागात उष्णतेच्या झळा बसण्याची दाट शक्यता असून काही ठिकाणी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ देखील होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. मात्र यावेळी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather Updates l विदर्भात पावसाचा जोर वाढणार? :

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना अक्षरक्ष: पावसाने झोडपून काढलं आहे. राज्यात एकीकडे तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. तर गेल्या आठवड्याभरापासून विदर्भात सलग पाऊस हजेरी लावत आहे.

अशातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस व विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

News Title – Today Weather Updates

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थान विरुद्ध हैदराबाद क्वालिफायर सामन्यात ‘या’ संघाचं वर्चस्व राहणार; पाहा हेड टू हेड

या राशीच्या व्यक्तींचा आर्थिक ताण कमी होण्याची शक्यता

‘फिर से दिखा दुंगा सडक पे खेल’; माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप

चक्रीवादळ धडकणार?; हवामान विभागानं दिली महत्त्वाची अपडेट

पुणे अपघातानंतर पुणे महानगरपालिका अॅक्शन मोडवर!