चक्रीवादळ धडकणार?; हवामान विभागानं दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Unseasonal Rain | राज्यामध्ये सध्या अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. अवकाळी पावसाने राज्यातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये कहर केला आहे. याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. तर दुसरीकडे शहरी भागात मुंबई येथील घाटकोपर येथे होर्डिंग दुर्घटनेनं नुकसान झालं. ही घटना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घडली आहे. अशातच आता वेगानं चक्रीवादळाबाबत वामान विभागानं दिली महत्त्वाची अपडेट दिलीये.

राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय. यामुळे राज्याला मोठा फटका बसला आहे. यामध्ये आणखी वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा पुढील काही दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Unseasonal Rain)

चक्रीवादळाची संभावना

याचपार्श्वभूमीवर हवामान अभ्यासकांनी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र असल्याने चक्रिवादळाची संभावना सांगितली आहे. या चक्रीवादळाने देशभरात मुसळधार पावसाची मोठी शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.

आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशासह इतर राज्यातील किनारपट्टीच्या प्रदेशावर मोठ्या हवामान बदलाची मोठी शक्यता असल्याचं बोललं जात आहे. ताशी 70 किमीवेगाने किनारपट्टी प्रदेशांना धडकण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Maharashtra Unseasonal Rain)

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास येत्या दोन ते तीन दिवसांत या वादळाचा काहीप्रमाणात तडाखा हा राज्याला देखील बसू शकतो. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Unseasonal Rain)

दोन ते तीन दिवसांपासून कोकणात अवकाळी पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस होताना दिसत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

News Title – Maharashtra Unseasonal Rain Marathi News Update

महत्त्वाच्या बातम्या

IPL मधील अपयशानंतर हार्दिकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?; लवकरच घेणार घटस्फोट?

पुणे अपघातप्रकरणी मोठा ट्विस्ट; आता आजोबांचीही चौकशी होणार

“स्वयंघोषित गांधी अण्णा हजारे 2014 नंतर गायबच झाले”

‘गाडी देऊन चूक केली’; मुलाने दोघांचा जीव घेतल्यानंतर विशाल अग्रवालला खंत

पुण्यासारखंच जळगावमध्ये मर्सिडीजनं चौघांना चिरडलं, राजकारण्याचा मुलगा मोकाट?