पुणे अपघातानंतर पुणे महानगरपालिका अॅक्शन मोडवर!

Pune News | पुणे शहरातील (Pune News) कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातामुळे केवळ पुणे शहरच नाहीतर आता राज्य पेटून उठलं आहे. याआधी पुणे अपघाताप्रकरणी कोणत्याच घटनेची चर्चा झाली नव्हती ती आता पाहायला मिळत आहे. याचा विपरित परिणाम हा पुणे शहरातील तरूण पिढीवर होताना दिसत आहे. पुणे शहारात (Pune News) अनधिकृत पब, बार खोलण्यात आले आहेत. याठिकाणी अल्पवयीन मुलं मद्यपानाचं सेवन करताना दिसत आहेत म्हणून आता एका पबवर महापालिकेने बुलडोजर लावल्याचं दिसत आहे. (Pune News)

पुणे शहरामध्ये (Pune News) कायदा आणि सुव्यवस्थेवर नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. पुणे शहरातील कल्याणीनगर येथे मोठी धक्कादायक घटना घडली होती. पोर्श वाहन चालवणाऱ्या वेदांत अग्रवाल नावाच्या अल्पवयीन मुलाने मद्यपान करून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या दोघांना उडवले. दोघेजण पार्टी करून परतले असता रविवारी मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला होता.

याप्रकरणाला आता राजकीय वळण देखील प्राप्त झालं आहे. यातून आता इतर अनेक वेगवेगळी माहिती समोर येताना दिसत आहे. याप्रकरणावर आता पुणे महानगरपालिकेने त्या जागेतील बेकायदेशीर पब आणि बारवर कायदेशीर कारवाई करायला सुरूवात केली आहे.

पुणे महानगरपालिका अॅक्शन मोडवर!

पुणे अपघाताप्रकरणी पोर्श गाडीचा 17 वर्षीय अल्पवयीन चालक वेदांत अग्रवाल हा ज्या पबमध्ये मद्यप्राशन करत होता. त्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पबमध्ये अल्पवयीन मुलाला प्रवेश दिल्याने पबवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. आता याच परिसरात असलेल्या इतर काही बेकायदेशीर बारवर तसेच काही पबवर कारवाई करून बुल्डोजरचा वापर करत महापालिकेने अॅक्शन घेतली आहे.

अल्पवयीन मुलावर कारवाई

तसेच अल्पवयीन मुलावर आरटीओच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. न्यायालयाने अल्पवयीन मुलाला काही अटींच्या आधारे जामीन दिला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलाला अपघात विषयावर निबंध लिहिण्याची अट घातली आहे. आरोपीला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लगेचच ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही. त्याला आता 25 वर्षे वयाची वाट पाहावी  लागणार असल्याचं अटींमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

News Title – Pune News Pune Porsche Accident Update Bulldozer Pattern

महत्त्वाच्या बातम्या

“पंकजा मुंडे, सुनेत्रा पवार विजयी होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष”

मोठी बातमी! शाहरूख खानची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल

पुणे अपघातप्रकरणी अमृता फडणवीसांनी केली मोठी मागणी!

आनंदवार्ता! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार

ऐश्वर्या रायवर होणार शस्त्रक्रिया?; मोठी अपडेट समोर