“त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत”

Rohit Pawar | कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेताना दिसत होते. यामुळे सध्या त्यांचा राजकारणातील वावर हा वाढलेला दिसत आहे. रोहित पवार (Rohit Pawar) हे कर्जत जामखेड एमआयडीसी प्रकरणी सरकारविरोधात भांडत आहेत. कर्जत जामखेड एमआयडीसी झाली तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यामुळे त्यांना एमआडीसीच्या मुद्द्याला घेऊन जोर लावला आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या एमआयडीसीच्या मुद्द्याला घेऊन सुनावलं आहे.

एमआयडीसीचा काही मोजक्याच लोकांना तसेच उद्योजकांना फायदा होणार आहे. तर मुळ लोकांच्या तोंडाला पानं पुसली जाणार असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. त्यानंतर आता याचं कनेक्शन हे नीरव मोदी यांच्यासोबत असल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे.

काय म्हणाले उमेश पाटील?

एमआयडीसीसाठी कवडीमोलाच्या भावाने जमीन खरेदी करण्यात येणार आहे. त्यात नीरव मोदींची जमीन आहे. त्याचे चार-चार क्षेत्र आहेत. काही धनाड्यांना फायदा होण्यासाठी एकाच खास क्षेत्रातील जमीन एसमआयडीसीसाठी संपादित करण्याची मागणी करण्यात येत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. नीरव मोदीला पैसे मिळावे म्हणून रोहित पवार (Rohit Pawar) यांना निवडून दिले आहे का?, असा सवाल उमेश पाटील यांनी केला आहे.

“त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे”

पाटेगाव आणि खंडाळा इथे ही एमआयडीसी व्हावी यासाठी आग्रह करत आहे. खंडाळा गावामधील बहुतेक खरेदी ही 2022 च्या आहेत. काही त्याच लोकांनी जमीनी खरेदी केल्या आहेत. काही ठराविक लोकांनी जागा खरेदी केल्या आहेत. हे सगळे शेतकरी आहेत का? हे कोणाचे मित्र आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रोहित पवार यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा आरोप केला आहे.

एमयडीसी झालीच पाहिजे. एमआयडीसी कुठेही झाली तरीही रोजगार मिळणार आहे. मुळ शेतकरी नसलेल्या लोकांना याचा फायदा होता कामा नये. या संपूर्ण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उद्योगमंत्री यांनी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केल्याचं उमेश पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघात एमआयडीसीसाठी प्रयत्न करत आहेत. याभागात जर एमआयडीसी प्रकल्प झाला तर याचा मोठा फायदा हा तालुक्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

News Title – Rohit Pawar Against Ajit Pawar Party Leader Umesh Patil Statement About Karjat Jamkhed MIDC

महत्त्वाच्या बातम्या

दिनेश कार्तिकच्या पहिल्या बायकोने केले ‘या’ क्रिकेटरसोबत लग्न! जाणून घ्या इन साईड आणि आऊट साईड स्टोरी

‘या’ शहरांना पेट्रोल दरवाढीचा झटका; जाणून घ्या आजचे इंधनदर

शाहरुख खानवर अजूनही उपचार सुरू?; हेल्थबद्दल मोठी अपडेट समोर

बाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

शरद पवारांना लागली बारामतीमधील विजयाची चाहुल; केलं मोठं वक्तव्य