दीपिकासाठी आलिया आली धावून, ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Deepika Padukone Pregnancy | अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone Pregnant) ही नेहमी कोणत्या न् कोणत्या कारणाने चर्चेत असते. दीपिका आणि रणवीर यांची जोडी नेहमीच चर्चेचा विषय ठरते. कॉफी विथ करण या कार्यक्रमात दीपिका आणि रणवीरने आपल्या नातेसंबंधांवर मोठा खुलासा केला होता. तेव्हा दीपिकाला ट्रोल करण्यात आलं होतं. आता दीपिका पादुकोण ही तिच्या प्रेग्नंसीवरून (Deepika Padukone Pregnant) चर्चेत आलीये. तिला त्यावरून ट्रोल केलं जात आहे. (Deepika Padukone Pregnant)

काही दिवसांआधी तिचा बेबी बंम्प दिसत नव्हता. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तर नुकतंच मुंबई येथे लोकसभा मतदानाचा पाचवा टप्पा पार पडला. त्यादिवशी दीपिका आणि रणवीरने मतदान केलं तेव्हा तिथे दीपिकाची बेबी बम्प दिसत होता. काही नेटकऱ्यांनी हा बेबी बम्प फेक असल्याच्या कमेंट केल्या आहेत. त्यावर एका पत्रकाराने नेटकऱ्यांना त्यांची जागा दाखवली आहे.

दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना फाये डिसुजाचं प्रत्युत्तर

प्रिय सोशल मीडिया दीपिका… पादुकोण ही तिच्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी बाहेर पडली होती. तिने शरिरावर तिच्या प्रेग्नंसीवर कोणताही फीडबॅक मागवला नव्हता. तुम्हाला तिच्या आयुष्यातील कोणत्याच पैलूंवर टीप्पणी करण्याचा अधिकार नाही. हे थांबवा आणि सुधारा, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. फाये डिसुजाच्या पोस्टला आलियाने लगेचच लाईक केलं आहे. आलियासोबत पूजा भट्टने देखील पोस्ट लाईक केली आहे. (Deepika Padukone Pregnant)

 

View this post on Instagram

 

A post shared by Faye D’Souza (@fayedsouza)

 

दीपिका सरोगसी पद्धतीने बाळाला देणार जन्म?

काही दिवसांआधी दीपिकाचा मुंबई एअरपोर्टवरील बेबी बम्प नसलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये दीपिकाला प्रेग्नंट होऊन काही महिने झाले आहेत तरीही बेबी बम्प कशी नाही असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला होता. तसेच काहींनी दीपिका ही सरोगसी पद्धतीने बाळाला जन्म देणार असल्याचं सांगितलं गेलं.

दीपिकाच्या सिनेमाबाबत बोलायचं झालं तर ती नुकतीच फायटर सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. ‘कल्की 2989 एडी’ या सिनेमातून दिसणार असल्याची चर्चा आहे.

News Title – Deepika Padukone Pregnancy On Alia Bhatt Answer To Netizons

महत्त्वाच्या बातम्या

ऐश्वर्याच्या एक्स बॉयफ्रेंडचा अभिषेक बच्चनबाबत मोठा खुलासा!

“तरूण पिढी नारळ पाणी पिण्यासाठी जाते का?”, वसंत मोरे संतापले

दिनेश कार्तिकच्या पहिल्या बायकोने केले ‘या’ क्रिकेटरसोबत लग्न! जाणून घ्या इन साईड आणि आऊट साईड स्टोरी

‘या’ शहरांना पेट्रोल दरवाढीचा झटका; जाणून घ्या आजचे इंधनदर

शाहरुख खानवर अजूनही उपचार सुरू?; हेल्थबद्दल मोठी अपडेट समोर