‘सोळा तास मी उपाशी होते, त्या लाडावलेल्या मुलाला मात्र…’; केतकी चितळे भडकली

Pune Car Accident | पुण्यात झालेल्या अपघातानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे बिल्डर विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांतने कारने दारूच्या नशेत दोघांना चिरडलं. या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी वेदांत अग्रवाल याला कोर्टाने 15 तासांच्या आत 300 शब्दांच्या निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन देखील दिला. यामुळे सर्वच क्षेत्रातून टीका केली जात आहे.

या प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळे हीने देखील संताप व्यक्त केलाय.केतकी चितळेने पुणे अपघात प्रकरणावर एका व्हिडीओतून आपली भूमिका मांडली आहे. या व्हिडीओत केतकीने पोलिसांवर हल्लाबोल केलाय.

केतकीला दोन वर्षापूर्वी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे अटक झाली होती. आता तिने तेव्हा पोलिसांनी दिलेली वागणूक आणि या अपघात प्रकरणातील आरोपीला दिलेल्या वागणुकीवर संताप व्यक्त केलाय.

काय म्हणाली केतकी चितळे?

“आपल्यासारखं सामान्य माणसांना सोळा-साडे सोळा तास उपाशी ठेवलं जातं. एक किलोमीटर अंतरापर्यंत वडापाव-किंवा भजीपावची गाडीच नाही, त्यामुळे तुझ्यासाठी खायला आणणं शक्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. तेव्हा सोळा तास मी उपाशी होते आणि आता रात्री तीन वाजता या लाडावलेल्या मुलासाठी पोलिस बर्गर पिझ्झा शोधत होते.”, असा संताप केतकीने व्यक्त केलाय.

तसंच अल्पवयीन आरोपी मुलाला वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला असल्याचे देखील केतकी म्हणाली.धडक देणारी कार हा अल्पवयीन मुलगा चालवणार नसल्याचे पोलीस सांगणार होते. पण, तिथे असणाऱ्यांनी व्हिडीओ काढले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांचा त्याला वाचवण्याचा प्लान फसला, असं केतकी म्हणाली.

पुणे अपघातमधील आरोपी बाल निरीक्षणगृहात

दरम्यान, या प्रकरणी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली असून सध्या ते पोलिस कोठडीमध्ये आहेत. तर, वेदांतला बाल सुधारणा गृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिलाय. बाल हक्क न्यायालयाच्या या निर्णयानंतर या आरोपीला बाल निरीक्षणगृह येथे ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.

News Title –  Ketaki Chitale anger over the Pune Car Accident

महत्त्वाच्या बातम्या-

डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटाबाबत मोठी अपडेट समोर!

डोंबिवली एमआयडीसीत बॉयलरचा स्फोट, तीन-चार किमीपर्यंत हादरे

IPL मधील अपयशानंतर हार्दिकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?; लवकरच घेणार घटस्फोट?

पुणे अपघातप्रकरणी मोठा ट्विस्ट; आता आजोबांचीही चौकशी होणार

“स्वयंघोषित गांधी अण्णा हजारे 2014 नंतर गायबच झाले”