Pune Porsche Accident | पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कारने दोघांना चिरडलं. यात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी वेदांत अग्रवाल याला कोर्टाने 15 तासांच्या आत जामीन देखील दिला. यामुळे राजकारण पेटलं आहे. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मोठी मागणी केली आहे.
अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणी संताप व्यक्त केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत थेट पुणे गाठलं. त्यांनी या प्रकरणी कठोर कारवाई आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. बिल्डर विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली असली तरी रोज नव-नवे खुलासे समोर येत आहेत. अशात अमृता फडणवीस यांची पोस्ट चर्चेत आलीये.
अमृता फडणवीसांची पोस्ट चर्चेत
“अनिश अवाधिया आणि अश्विनी कोस्टा यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. आरोपी वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झाली पाहिजे. बालन्याय मंडळाचा निषेध”, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.
My heartfelt condolences to families of Aneesh Awadhiya and Ashwini Kostha .
The culprit #VedantAgarwal should be hard punished !
Shame on Juvenile Justice Board !#Pune— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 22, 2024
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे 3 वाजता एक धक्कादायक घटना घडली. व्यावसायिकाच्या 17 वर्षीय मुलाने आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या मुलाचे नाव वेदांत अग्रवाल असं आहे. या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघा जणांनी आपले प्राण गमावले आहे. या घटनेनंतर वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.
यासोबतच अल्पवयीन वेदांत हा बार आणि पबमध्ये गेला होता. त्यावेळी प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, व्यवस्थापक सचिन काटकर, बार व्यवस्थापक (Pune Porsche Accident ) जयेश बोनकर यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी राजकीय नेत्यांनी देखील उडी घेतली आहे. काँग्रेसकडून याची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिलाय. मात्र, अल्पवयीन असलेला आरोपी दारू पीत असल्याचे CCTV फुटेज असूनही हा अहवाल आल्याने (Pune News) पोलिसांच्या तपासावर देखील आता प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.
News Title – amruta fadnavis reaction on Pune Porsche Accident
महत्त्वाच्या बातम्या-
‘महिला पोलिसही पबमध्ये…’; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ
‘माझा मुलगा निष्ठांवत अन् कणखर’; पित्याकडून मुलाचं तोंडभरून कौतुक
पोलिसांना शिवीगाळ करणं भाजप नेत्याला पडलं महागात, अखेर…
‘अमोलने एकनाथ शिंदेंची ऑफर नाकारली’; गजानन किर्तीकरांचा मोठा खुलासा
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी महाराष्ट्रातलं अख्खं गाव विकत घेतलं!