मोठी बातमी! शाहरूख खानची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल

Shahrukh Khan Health | अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan Health) हा त्याच्या चित्रपटांना घेऊन नेहमी चर्चेत असतो. त्याची केवळ भारतातच नाहीतर जगभरात फॅन फॉलोईंग आहे. मात्र आता अभिनेता शाहरूख खानच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट (Shahrukh Khan Health) समोर आली आहे. त्याला अहमदाबादच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला उष्णतेचा त्रास झाल्याने त्याची प्रकृती बिघडल्याची (Shahrukh Khan Health) मोठी अपडेट आता समोर आली आहे.

शाहरूख खान अहमदाबादच्या केडी रूग्णालयात दाखल

देशामध्ये आयपीएलचा थरार सुरू आहे. अभिनेता शाहरूख खान हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा संघमालक आहे. तो नेहमी आपल्या संघाला चेअरअप करण्यासाठी सामन्यादिवशी येत असतो. मात्र शाहरूख खानला उष्णतेचा फटका सहन करावा लागल्याने अहमदाबादच्या केडी रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा धक्कादायक प्रकार घडला. (Shahrukh Khan Health)

उष्मघाताने शाहरूख खानची तब्येत बिघडली

सध्या उष्णतेने नको नको केलं आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. देशातील अनेक राज्यात उष्णतेचा फटका बसत आहे. या उष्मघाताने शाहरूख खानची तब्येत बिघडली आणि त्याला दुपारी 2 वाजता अहमदाबाच्या केडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शाहरूख खानमुळे रूग्णालयाला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सध्या शाहरूखचे चाहते चिंतेत असल्याचं दिसत आहे. तो सोमवारी मुंबई येथे मतदान करून अहमदाबादकडे निघाला. मात्र उष्मघाताने शाहरूखच्या प्रकृतीवर त्याचा थेट परिणाम झाला.

शाहरूख खानच्या चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर डंकी, पठाण आणि जवान चित्रपटाने मागील वर्षी छप्परफाड कमाई केली आहे. शाहरूखचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरले आहेत. त्याला आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

शाहरूख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान बाप-बेटी एकाच सिनेमात दिसणार आहेत. आपल्या मुलीच्या करिअरला घेऊन शाहरूखने आपल्या मुलीसोबत चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर करणार असल्याचं बोललं जात आहे. त्या चित्रपटाचं नाव हे किंग असणार आहे.

News update – Shahrukh Khan Health Update News

महत्त्वाच्या बातम्या

आनंदवार्ता! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार

ऐश्वर्या रायवर होणार शस्त्रक्रिया?; मोठी अपडेट समोर

घटस्फोटानंतर सानियाची नव्याने आयुष्याला सुरुवात; शोएबचं नाव काढत..

‘महिला पोलिसही पबमध्ये…’; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

‘माझा मुलगा निष्ठांवत अन् कणखर’; पित्याकडून मुलाचं तोंडभरून कौतुक