“पंकजा मुंडे, सुनेत्रा पवार विजयी होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष”

Mahadev Jankar | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 नुकतीच पार पडली आहे. यामध्ये काही मतदारसंघाकडे केवळ राज्य नाहीतर देशाचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रचार करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. गावोगावी, वाड्या वस्त्यांवर बीड, बारामती तसेच इतर प्रतिष्ठीत मतदारसंघात कोण बाजी मारणार याबाबत अनेकजण उत्कंठावर्धक आहेत. याबाबतच महायुतीच्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, महायुतीचे नेते हे महायुतीच्या अधिक जागा जिंकून येतील असा दावा करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सर्वाधिक आमच्याच जागा येतील असा दावा करत आहेत. मात्र याबाबतची माहिती येत्या 4 जून रोजी निकालादिवशी समोर येईल. अशातच आता महायुतीचे नेते आणि रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले महादेव जानकर?

महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी महायुतीच्या जागांवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे मात्र सर्व 48 जागा महायुती निवडून येणार असल्याचा दावा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला होता. अशातच त्यांनी बारामती मतदारसंघ, बीड मतदारसंघ आणि त्यांच्या परभणी मतदारसंघाबाबत वक्तव्य केलं आहे.

“….काळ्या दगडावरील पांढरी रेष”

बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरूद्ध पवार अशी लढत होती या लढतीवर महादेव जानकर यांनी भाष्य केलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार, बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे आणि परभणीमध्ये मी निवडून येईल ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे, असं वक्तव्य स्वत: महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केलं आहे.

बीडमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जातीय राजकारण पाहायला मिळालं होतं. या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी भाष्य केलं आहे. बीड लोकसभा मतदारसंघात याआधी कधीच असं जातीय राजकारण पाहायला मिळालं नाही. बीडमध्ये बहिण भावाने जातीय राजकारणावर प्रहार केला आहे, असं महादेव जानकर म्हणाले आहेत.

तसेच मराठा समाजाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे मराठा समाजाचे असल्याने शरद पवार गटातून लढत होते. तर दुसरीकडे पंकजा मुंडे या भाजपकडून निवडणूक लढवत होत्या. यामुळे ओबीसी विरूद्ध मराठा असे मतांचे ध्रुवीकरण पाहायला मिळालं आहे.

News Title – Mahadev Jankar Big Statement About Baramati Loksabha, Parbhani Loksabha And Beed Loksabha

महत्त्वाच्या बातम्या

घटस्फोटानंतर सानियाची नव्याने आयुष्याला सुरुवात; शोएबचं नाव काढत..

‘महिला पोलिसही पबमध्ये…’; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

‘माझा मुलगा निष्ठांवत अन् कणखर’; पित्याकडून मुलाचं तोंडभरून कौतुक

पोलिसांना शिवीगाळ करणं भाजप नेत्याला पडलं महागात, अखेर…

‘अमोलने एकनाथ शिंदेंची ऑफर नाकारली’; गजानन किर्तीकरांचा मोठा खुलासा