या राशीच्या व्यक्तींनी वादाचे प्रसंग टाळावेत अन्यथा होईल मोठं नुकसान

Today Horoscope l मेष:- कलात्मक गोष्टींची ओढ वाढेल. बौद्धिक चर्चा कराल. जुन्या आठवणींनी मनाला समाधान मिळेल. खर्चासाठी हात आवरता घ्यावा. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. शुभ अंक ९, शुभ रंग पोपटी

वृषभ:- बोलण्यातून समोरच्यांची मने जिंकाल. हातातील कामात खंड पडू देऊ नका. घरातील कामांची जबाबदारी वाढेल. मनात उगाच शंका आणू नका. आरोग्याबाबत हलगर्जीपणा करू नका. शुभ अंक ५, शुभ रंग लाल

मिथुन:- आपल्या निर्णयावर ठाम राहावे. लोकांशी वैयक्तिक संपर्क टाळावा. आवडीच्या गोष्टी करण्यात अधिक रमून जाल. अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. शुभ अंक २, शुभ रंग हिरवा

कर्क:- सर्वांशी आपुलकीने वागा. बाहेरील लोकांना भेटणे टाळा. जबाबदारीची जाणीव जागृत ठेवा. प्रिय व्यक्तीची भेट होईल. हौसेवर पैसे खर्च कराल. शुभ अंक ८, शुभ रंग काळा

सिंह:- मित्रांशी गप्पा रंगतील. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. मनातील खिन्नता काढून टाकावी. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या कामाची शाबासकी मिळेल. शुभ अंक १, शुभ रंग गुलाबी

कन्या:- घरातील वातावरण आनंद देऊन जाईल. वरिष्ठांशी शांतपणे वागा. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. विनाकारण कुणाच्या मदतीला धावू नका. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या. शुभ अंक ४, शुभ रंग लाल

Today Horoscope l तूळ:- उत्तम वाचनाचा आनंद घ्याल. तिखट पदार्थ टाळा. भावंडांसाठी पैसा खर्च होईल. एखादी नवीन योजना सुचेल. शांत राहून मानसिक स्वास्थ्य अनुभवा. शुभ अंक ६, शुभ रंग पिवळा

वृश्चिक:- मुलांवरील खर्च वाढेल. आपल्या बोलण्याचा कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. अधिकार जपून वापरा. वादाचे प्रसंग टाळावेत. संपर्कातील लोकांशी फटकून वागू नका. शुभ अंक ३, शुभ रंग निळा

धनू:- समोरच्याचे शांतपणे ऐकून घ्यावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. आर्थिक बाबतीत उत्तम दिवस. आहारावर नियंत्रण हवे. उत्साहाच्या भरात अनाठायी खर्च वाढू शकतो. शुभ अंक ५, शुभ रंग पिवळा

मकर:- छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा. इतरांच्या कामात दिवस घालवाल. जुनी कामे व्यवस्थित पार पडतील. उदात्त दृष्टीकोन ठेवाल. दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाल. शुभ अंक ९, शुभ रंग पोपटी

कुंभ:- निरूत्साह झटकून कामाला लागा. घरातील कामे मार्गी लावा. जुन्या गोष्टींबाबत मनात संभ्रम बाळगू नका. धाडस दाखवताना सारासार विचार करावा. समस्यांचे निराकरण करता येईल. शुभ अंक २, शुभ रंग गुलाबी

Today Horoscope l मीन:- स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बाळगा. अचानक येणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवा. अतितिखट पदार्थ कमी खा. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. मुलांना वेळ द्यावा. शुभ अंक ५, शुभ रंग निळा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

“पंकजा मुंडे, सुनेत्रा पवार विजयी होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष”

मोठी बातमी! शाहरूख खानची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल

पुणे अपघातप्रकरणी अमृता फडणवीसांनी केली मोठी मागणी!

आनंदवार्ता! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार

ऐश्वर्या रायवर होणार शस्त्रक्रिया?; मोठी अपडेट समोर