आनंदवार्ता! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार

Monsoon Rain | राज्यात सध्या ढगाळ हवामान निर्माण झालंय. कुठे कडक ऊन तर कुठे अवकाळी पाऊस असं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येतंय. नागरिक उकाड्यामुळे त्रस्त झाले आहेत. उन्हाच्या चटक्यांमुळे घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय. आता हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे.

उष्ण आणि दमट हवामानापासून दिलासा मिळावा म्हणून लोक मोसमी पावसाची आतुरतेनं वाट पाहात आहेत. या सर्वांसाठी भारतीय हवामान विभागाने गुड न्यूज दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

नैर्ऋत्य मॉन्सून आज (22 मे) दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीवचा काही भाग, कोमोरिन परिसर, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात दाखल झालाय. येत्या दोन दिवसांत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती राहील.

‘या’ दिवशी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार

केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. उत्तर केरळच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झालीये. यामुळे केरळ आणि शेजारच्या भागात पावसाचा अंदाज आहे. राज्यात मागील 10 ते 12 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्याच्या काही भागात पुन्हा पावसाचा (Monsoon Rain) अंदाज दिलाय.

हवामान विभागाने आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिलाय. कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीतही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे.

‘या’ ठिकाणी उष्णतेची लाट येणार

दुसरीकडे रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी हवामान उष्ण राहण्याचा अंदाज आहे. येथे रात्री देखील उकाडा वाढला आहे. राज्यासह देशात पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात 25 मेपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

News Title – Monsoon Rain Update

महत्त्वाच्या बातम्या-

घटस्फोटानंतर सानियाची नव्याने आयुष्याला सुरुवात; शोएबचं नाव काढत..

‘महिला पोलिसही पबमध्ये…’; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

‘माझा मुलगा निष्ठांवत अन् कणखर’; पित्याकडून मुलाचं तोंडभरून कौतुक

पोलिसांना शिवीगाळ करणं भाजप नेत्याला पडलं महागात, अखेर…

‘अमोलने एकनाथ शिंदेंची ऑफर नाकारली’; गजानन किर्तीकरांचा मोठा खुलासा