‘फिर से दिखा दुंगा सडक पे खेल’; माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप

Pune News |  पुणे शहरात (Pune News) बेकायदेशीर अल्पवयीन वाहनचालकाने कल्याणीनगर येथे निर्दोष दोघांना उडवले. या घटनेने पुणेच नाहीतर राज्य हादरलं आहे. त्यानंतर आता त्या माजोरड्या अल्पवयीन मुलाने रॅपच्या माध्यमातून पैशाची ताकद दाखवून दिली आहे.

14 ते 15 तासात वेदांतला जामीन मंजूर

त्यानंतर अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांना संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. वेदांतला देखील ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर, बाल हक्क मंडळाने 14 दिवसांसाठी त्यास बाल सुधारगृहात पाठवले आहे. मात्र केवळ 14 ते 15 तासात वेदांतला जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी काही अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या होत्या. वेदांत हा पुण्यातील (Pune News) व्यवसायिकाचा मुलगा होता. मात्र काही तासात अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला.

जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा रॅपच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेला फाट्यावर मारलं आहे. त्याने आपल्या रॅपच्या माध्यमातून माज दाखवत पुन्हा रस्त्यावर हा खेळ दाखवणार असल्याचा उल्लेख त्याच्या रॅपच्या माध्यमातून केला आहे. पैशाची गुर्मी त्याने त्या रॅपच्या माध्यमातून दाखवली आहे. (Pune News)

त्याचा रॅप पाहून आता नेटकरी चांगलेच भडकले आहेत. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा रॅपची लाट उसळली आहे. मात्र हा व्हिडीओ एआय किंवा डीपफेक आहे का? याचा तपास करण्यात येत आहे. सायबर तज्ञ हा व्हि़डीओचा तपास करत आहेत.

वेदांत अग्रवाल या आरोपीला कसलाच पश्चाताप झाला नाही. दारू पिऊन आपण कार चालवली असल्याचा त्याला अभिमान आहे. बिल्डरचा मुलगा असल्याने मला जामीन मिळाल्याचं त्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

रॅप साँग

करके बैठा मै नशे…

इन माय पोर्शे

सामने आया कपल मेरे

अब वो है निचे

साऊंड सो क्लिंचे

सॉरी गाडी चढ आप पे

17 साल की उमर, पैसे मेरे बाप के

1 दिन में मिल गयी मुझे बेल

फिर से दिखा दुंगा सडक पे खेल

प्लेइंगद केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार

News Titlke – Pune News Pune Porsche Car Accident On Rap Song

महत्त्वाच्या बातम्या

चक्रीवादळ धडकणार?; हवामान विभागानं दिली महत्त्वाची अपडेट

पुणे अपघातानंतर पुणे महानगरपालिका अॅक्शन मोडवर!

“त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत”

दीपिकासाठी आलिया आली धावून, ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

‘सोळा तास मी उपाशी होते, त्या लाडावलेल्या मुलाला मात्र…’; केतकी चितळे भडकली