तरुणांना स्वस्तात मस्त असलेल्या या बाईक्सची क्रेझ; जाणून घ्या किंमत

Best Bikes l आजकाल तरुणांना भन्नाट आणि आकर्षक फीचर्स असलेल्या बाईक जास्त आवडतात. जर तुम्ही सुद्धा अशी बाइक शोधत असाल आणि तिचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि दिसायला देखील चांगली आहे, तर आज आपण अशा 3 बाइक्सबद्दल सांगणार आहोत. ज्या तुमच्यासाठी सर्वोत्तमअसू शकतात.

भन्नाट फीचर्ससह या बाईक आहे सर्वात्तम :

Bajaj Pulsar NS400Z :

बजाज ऑटोने आणलेली नवीन पल्सर NS400z त्याच्या सिरीजमधील इतर बाइक्सप्रमाणेच डिझाइनच्या बाबतीत प्रभावित करते. या बाईकची एक्स-शो रूम किंमत 1.85 लाख रुपये आहे. या आकर्षक अशा बाइकमध्ये 373.27cc इंजिन आहे जे की ते 40PS पॉवर आणि 35 Nm टॉर्क जनरेट करते.

या बाईकमध्ये तुम्हाला अतिशय स्मूद असे 6 स्पीड गिअरबॉक्स मिळत आहेत, ज्यामुळे तुम्हाला राइडिंगचा खूप चांगला अनुभव मिळेल. सुरक्षेच्या दृष्टीने बाइकला पुढील बाजूस 320mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 230mm डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यासह ड्युअल-चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) तसेच 3 स्तर ट्रॅक्शन कंट्रोल देखील उपलब्ध आहेत.

Best Bikes l तरुणांना या दोन बाईकचा करावा विचार :

Hero Mavrick 440 :

Hero Mavrick 440 ही एक दमदार बाईक आहे. यामध्ये स्पोर्टी लूक आणि पॉवरफुल फीचर्ससोबतच हिरोची ब्रँड व्हॅल्यूही आहे. या बाइकमध्ये 440CC इंजिन आहे जे 27 bhp पॉवर आणि 36 Nm टॉर्क देते. यासोबतच यात 6 स्पीड गिअरबॉक्स आहे आणि जर ब्रेकिंगबद्दल बोलायचे झाले तर समोर 320 मिमी डिस्क आणि मागील बाजूस 240 मिमी डिस्क आहे. फीचर्सचा विचार केला तर यामध्ये 35 हून अधिक कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएस देण्यात आला आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख रुपये आहे.

TVS Ronin :

TVS Ronin ही नवीन डिझाइन असलेली बाईक आहे. या बाइकला 225.9 cc इंजिन देण्यात आले आहे, जे 20.40 PS पॉवर आणि 19.93 Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकचा टॉप स्पीड 120kmph आहे. आणि या बाईकची सुरुवातीची किंमत 1.49 लाख रुपये आहे. तुम्ही ही बाईक फक्त शहरातच चालवू शकत नाही तर तुम्ही ती टूर किंवा लांब पल्ल्याच्या मार्गांवर देखील चालवू शकता.

News Title – Best Bikes Under 2 Lakh

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाकडे केली सर्वात मोठी मागणी

सोसाट्याच्या वाऱ्यासह राज्यातील ‘या’ भागात पाऊस धुमाकूळ घालणार

राजस्थान विरुद्ध हैदराबाद क्वालिफायर सामन्यात ‘या’ संघाचं वर्चस्व राहणार; पाहा हेड टू हेड

या राशीच्या व्यक्तींचा आर्थिक ताण कमी होण्याची शक्यता

‘फिर से दिखा दुंगा सडक पे खेल’; माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप