दहावीचा निकाल लवकरच होणार जाहीर! अशाप्रकारे पाहा निकाल

SSC Result l दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच SSC परीक्षा 2024 चा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पत्रकार परिषदेद्वारे जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात.

मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात लागणार निकाल :

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्ड मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करू शकतो. मात्र, बोर्डाने अद्याप निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. 10वी बोर्डाची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. जवळपास 16 लाख मुली आणि मुले परीक्षेला बसले होते. बोर्डाने 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर केला आहे.

2023 मधील माध्यमिक परीक्षेसाठी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यामध्ये 8 लाख 44 हजारांहून अधिक मुले आणि 7 लाख 33 हजारांहून अधिक मुलींचा समावेश होता. एकूण निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. मुलींचा निकाल ९५.८७ टक्के तर मुलांचा ९२.०५ टक्के लागला. तर एकूण 23,013 शाळांपैकी 6,844 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

SSC Result l अशा प्रकारे तुम्ही एसएमएसद्वारे निकाल पाहू शकता :

निकाल जाहीर झाल्यानंतर, एसएससी बोर्डाच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी एसएमएसद्वारे देखील निकाल पाहू शकतात. त्यासाठी फोनच्या मेसेज ॲपवर जा आणि MHSSC टाईप करा नंतर स्पेस द्या आणि रोल नंबर टाइप करा आणि 57766 या क्रमांकावर पाठवा. तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा निकाल येईल.

– सर्वात प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
– त्यानंतर महाराष्ट्र SSC निकाल 2024 च्या लिंकवर येथे क्लिक करा.
– येथे रोल नंबर टाका आणि सबमिट करा.
– तुमच्या स्क्रीनवर मार्कशीट दिसेल.

News Title – Maharashtra SSC Result

महत्त्वाच्या बातम्या

तरुणांना स्वस्तात मस्त असलेल्या या बाईक्सची क्रेझ; जाणून घ्या किंमत

महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाकडे केली सर्वात मोठी मागणी

सोसाट्याच्या वाऱ्यासह राज्यातील ‘या’ भागात पाऊस धुमाकूळ घालणार

राजस्थान विरुद्ध हैदराबाद क्वालिफायर सामन्यात ‘या’ संघाचं वर्चस्व राहणार; पाहा हेड टू हेड

या राशीच्या व्यक्तींचा आर्थिक ताण कमी होण्याची शक्यता