पुणे अपघात प्रकरणातील सीसीटीव्हीबाबत धक्कादायक खुलासा समोर!

Pune Porsche Accident |  पुण्यातील कल्याणीनगर येथे रविवारी पहाटे 3.15 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं भरधाव वेगानं चालवलेल्या पोर्शे कारनं दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडलं. आता या अपघात प्रकरणात दरोरज नवनवे खुलासे होत आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआरमध्ये छेडछाड

सरकारी पक्षाच्या वकीलांनी आरोपी विशाल अग्रवालच्या (Vishal Patil) घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या (CCTV) डीव्हीआरमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केलाय. तसंच विशाल अग्रवाल यांच्या घरातील गेटवरील नोंदणी रजीस्टर, मोबाईल ताब्यात घेतले असून मोबाईलमधील डाटाचं तपास सुरू आहे.

गाडीची नोंदणी झाली नसून, ब्रह्मा लेजेस कंपनीच्या नावावर गाडी आहे. ड्रायव्हरकडे आणखी चौकशी करायची असून सर्व आरोपींचीही चौकशी करण्यासाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकीलांनी केलीये.

Pune Porsche Accident | ड्रायव्हर आणि विशाल अग्रवालची समोरासमोर चौकशी होणार 

ड्रायव्हर आणि विशाल अग्रवालची समोरासमोर चौकशी करायचीये. आरोपीसोबत आणखी काही मित्र होते का त्या सर्वांनी दारूशिवाय आणखी काही सेवन केलं होतं का याचाही तपास करायचा असल्याचं सरकारी वकीलांनी सांगितलंय. तर आरोपींवर लावण्यात आलेली कलमं जामीनपत्र असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकीलांकडून करण्यात आलाय.

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन (Pune Porsche Accident) पुणे पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेतली. आरोपीविरोधात भक्कम केस उभी करण्याचा प्रयत्न असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. विशाल अग्रवालच्या मुलावर आयपीसी कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अपघात प्रकरणाचा तपास योग्यरितीने सुरु असल्याचे सांगितले. आम्ही याप्रकरणात स्ट्राँग केस तयार करु, असा दावा त्यांनी केला.

 महत्त्वाच्या बातम्या-

“गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत”

कोर्टाने सरकारी वकिलांची मागणी फेटाळली; विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा

‘मी माझ्या बॉयफ्रेंडचा फोन…’; जान्हवी कपूरचा मोठा खुलासा

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण; वेदांत अग्रवालच्या ड्रायव्हरच्या जबाबाने खळबळ

‘ऐश्वर्याने बच्चन कुटुंब सोडलं?’, ऐश्वर्याच्या नव्या पोस्टमुळे खळबळ