कोर्टाने सरकारी वकिलांची मागणी फेटाळली; विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा

Pune porsche accident | पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे अशी माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली आहे.

विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

विशाल अग्रवालवर आज पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय. याप्रकरणी आम्हाला आणखी तपास करायचा आहे. त्यामुळे विशाल अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांची पोलीस कोठडी आम्हाला मिळावी, अशी मागणी पुणे पोलिसांनी आज कोर्टात युक्तिवाद करताना केली.

कोर्टाने या प्रकरणी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असं स्पष्ट केलं. तसेच न्यायालयीन कोठडीत चौकशी केली जाईल, असं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाने विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा

या प्रकरणातील विशाल अग्रवालसोबत सर्वच सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता विशाल अग्रवाल हे उच्च न्यायालयात जाऊ शकतात आणि जामीनासाठी अर्ज करू शकतात.

ही अपघाताची केस आहे. मात्र यामध्ये मीडिया ट्रायल सुरु आहे. 1 हजार 758 रुपये फी भरली नाही म्हणून शासनाची फसवणूक केल्याचं म्हणत अगरवालांवर कलम 420 लावलं. आरोपीने पॉकेटमनीतून पबमध्ये पैसे भरले की बँक खात्यातून याचा तपास करावा. पैसे कुठून भरले याचा तपास करायला पोलिसांना वेळ का लागतो?, असा युक्तिवाद विशाल अग्रवालच्या वकिलांनी केला.

विशाल अगरवालवर आरटीओच्या तक्रारीनंतर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना त्याची नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल हा गुन्हा दाखल करण्यात येणार.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मी माझ्या बॉयफ्रेंडचा फोन…’; जान्हवी कपूरचा मोठा खुलासा

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण; वेदांत अग्रवालच्या ड्रायव्हरच्या जबाबाने खळबळ

‘ऐश्वर्याने बच्चन कुटुंब सोडलं?’, ऐश्वर्याच्या नव्या पोस्टमुळे खळबळ

“तुला तंगडी सकट बाहेर ओढतो”; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा

पुणे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; गाडीत बसलेले वेदांतचे मित्र अडचणीत