‘ऐश्वर्याने बच्चन कुटुंब सोडलं?’, ऐश्वर्याच्या नव्या पोस्टमुळे खळबळ

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही सध्या बॉलिवूडपासून लांब आहे. ती तिच्या वैयक्तिक जीवनाला घेऊन नेहमी चर्चेत असते.  मध्यंतरी तिच्या घटस्फोटाबाबत अनेक अपडेट समोर येत होत्या. ऐश्वर्याच्या नव्या एका पोस्टमुळे ऐश्वर्याने बच्चन (Aishwarya Rai) कुटुंब सोडलं की काय? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे.

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलला भेट देऊन आली. तिने तिथे रॅम्प वॉक देखील केला. तिचा हात फ्रॉक्चर झाल्याचं दिसत होतं. ऐश्वर्या कान्सवरून आपल्या आईच्या घरी परतली आहे. तिने नुकताच आपल्या आईचा वाढदिवस साजरा केला आहे. मात्र फोटोमध्ये ऐश्वर्या, मुलगी आराध्या आणि ऐश्वर्याची आई दिसत आहे. यामध्ये अभिषेक बच्चन दिसत नसल्याने अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा आला आहे का?, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

ऐश्वर्याची पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर आता ऐश्वर्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ऐश्वर्याची आई, मुलगी आणि तिचे दिवंगत वडील दिसत आहे. या फोटोला तिने तिच्या फोटोला प्रिय आई-बाबा अशी पोस्ट लिहिली आहे. आता ऐश्वर्याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 

पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या पोस्टखाली घटस्फोटावर कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी अभिषेक कुठे आहे?, असा सवाल केला आहे. यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. (Aishwarya Rai)

बीग बी बच्चन यांचा प्रतीक्षा नावाचा बंगला हा अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन यांच्या नावे केला आहे. तसेच अनेकदा काही पोस्टमुळे देखील चाहत्यांना धक्का बसला होता.

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाबद्दल चर्चा सुरू आहेत. अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेक पापराझींसमोर एकत्र येताना दिसत नाहीत. ते नेहमी वेगवेगळे असतात. यामुळे त्यांच्यातील नातेसंबंधांवर अनेक तर्क-वितर्क लावले जातात.

News Title- Aishwarya Rai Left Bachchan Family Netizens Comment On Aishwarya rai Mother Birthday Post

महत्त्वाच्या बातम्या

“तुला तंगडी सकट बाहेर ओढतो”; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा

पुणे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; गाडीत बसलेले वेदांतचे मित्र अडचणीत

आमदार सुनील टिंगरेंच्या भूमिकेबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा!

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन केला, तर सगळं सॉलव्ह होईल’; अग्रवालांच्या निकटवर्तीयांची अरेरावी

पुणे अपघात प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; नव्या दाव्याने खळबळ