पुणे अपघात प्रकरणी मोठी अपडेट; गाडीत बसलेले आरोपीचे मित्र अडचणीत

Pune News | पुणे अपघात प्रकरणाला आता वेगळं वळण प्राप्त झालं आहे. याप्रकरणी आता प्रत्येकाची चौकशी करण्यात येणार आहे. अपघातावेळी गाडीत असलेल्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस कसून चौकशी करणार

हे सर्वजन कुठे होते?, पार्टीत नेमकं काय झालं? पार्टीत कोण होतं? या सर्व गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. अपघातावेळी असणाऱ्या मित्रांना त्यांच्या पालकांसोबत पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात बोलावण्यात आलं आहे. पार्टीत तिघेही सीसीटीव्हीमध्ये दिसत होते. तसेच तेच मद्यप्राशन करताना दिसत होते. आतापर्यंत त्याची चौकशी करण्यात आली मात्र त्याच्या गाडीत असणाऱ्यांची चौकशी का करण्यात आली नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. (Pune News)

याप्रकरणी आता पोलिसांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तांच्या निर्देशाखाली नेमण्यात आलेली पोलिसांची समिती येरवडा पोलिसांची चौकशी करेल. (Pune News)

दोन दोन एफआरआयची का नोंदणी करण्यात आली. यासंदर्भात कोणी दबाव आणलेला का? त्या अल्पवयीन मुलाचं मेडिकल चेकअप कधी झालं. याचा तपास करण्यात येणार आहे.

पुणे अपघात प्रकरणाला राजकीय रंग

याप्रकरणात अल्पवयीन मुलाला 15 तासात जामीन मंजूर केल्याप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. इतर अनेक विरोधकांकडून आरोप करण्यात आले आहेत. या मुलाला कोण वाचवतंय? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. (Pune News)

यावर आता रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ, संजय राऊत, राहुल गांधी यांनी यावर भाष्य केलं आहे. याप्रकरणी सरकारविरोधात टीकेच्या तोफा डागल्या जात आहेत. यामुळे काही दिवसांआधी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात हजेरी लावून वरिष्ट अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी लागली आहे.

News Title – Pune News Pune Accident Twist New Update

महत्त्वाच्या बातम्या

पुणे अपघात प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; नव्या दाव्याने खळबळ

दहावीचा निकाल लवकरच होणार जाहीर! अशाप्रकारे पाहा निकाल

तरुणांना स्वस्तात मस्त असलेल्या या बाईक्सची क्रेझ; जाणून घ्या किंमत

महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाकडे केली सर्वात मोठी मागणी

सोसाट्याच्या वाऱ्यासह राज्यातील ‘या’ भागात पाऊस धुमाकूळ घालणार