Pune Metro पुणेकरांची एक चिंता मिटली, आता मेट्रो स्टेशनला गाडी घेऊन जा बिनधास्त!

Pune Metro | पुणे मेट्रोचे काम हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) करण्यात येत आहे. या मेट्रोच्या हिंजवडी (Hinjawadi) ते शिवाजीनगर (Shivajinagar) मार्गावरील स्थानकांना काही ठिकाणी वाहनतळाचा प्रश्न मोठा अडचणीचा ठरला होता. वाहनतळाच्या मुद्द्यावरुन (Pune Metro Parking Issue) अडचणीत सापडलेल्या पुणे मेट्रोची चांगलीच कोंडी झाली होती. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी पीएमआरडीएने महापालिकेकडे (Pune Municipal Corporation) आरक्षित भूखंडांची मागणी केली होती, यावर एक अत्यंत चांगला तोडगा निघाला आहे आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

वाहनतळासाठी निघाला चांगला तोडगा-

महापालिकेने मेट्रो स्थानकांना (Pune Metro) 100 ते 400 मीटर अंतरातील 8 भूखंड देण्याची तयारी दर्शविली  आहे, याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती आहे. पुणे मेट्रोचा विचार केला तर एकूण 23 स्थानके आहेत. या स्थानकांपैकी फक्त माण, बालेवाडी आणि शिवाजीनगर या तीनच स्थानकांना वाहनतळासाठी जागा उपलब्ध होती, बाकी स्थानकांना मात्र वाहनतळासाठी जागा नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता.

अखेर वाहनतळासाठी स्थानकांना जागा मिळत नसल्याने पीएमआरडीएने महापालिकेकडे धाव घेतली होती. याबाबत PMRDAने मागील महिन्यात महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Pune Vikram Kumar) यांना पत्र लिहीले होते. या पत्रात महापालिकेकडे बाणेर (Baner) आणि बालेवाडी (Balewadi) परिसरातील एकूण 8 आरक्षित भूखंडांची मागणी करण्यात आली होती. हे भूखंड पुणे मेट्रोला मिळाल्यास बालेवाडी क्रीडा संकुल, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेरगाव आणि बाणेर या सात मेट्रो स्थानकांवरील वाहनतळांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होणार आहे.

महापालिकेने आधी दिला होता नकार-

मेट्रो स्थानकांच्या (Pune Metro) वाहनतळासाठी पीएमआरडीएने महापालिकेकडे आधी सुद्धा जागा मागितली होती. परंतु, या जागा वेगवेगळ्या ठिकाणी आणि खासगी मालकीच्या असल्यामुळे महापालिकेपुढे अडचण निर्माण झाली होती आणि PMRDAने नकार सुद्धा दिला होता, त्याऐवजी महापालिकेने आरक्षित भूखंड देण्याची तयारी दर्शवली होती.

पीएमआरडीएने सोईचे आरक्षित भूखंड शोधून या भूखंडांची यादी महापालिकेला दिली होती. हे सर्व भूखंड 7 मेट्रो स्थानकांच्या सुमारे 100 ते 400 मीटर अंतरावर आहेत. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र वाहनतळ उभारणे सोईचे ठरणार आहे. आता लवकरच यासंदर्भात सकारात्मक निर्णय येणार असल्याची माहिती आहे.

आरक्षित भूखंड समिती शिक्कामोर्तब करणार

पीएमआरडीएने महापालिकेकडे मागितलेले भूखंड वेगवेगळ्या कारणांसाठी आरक्षित आहेत. वाहनतळासाठी वापर करायचा असल्यास आरक्षण बदलावं लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आरक्षित भूखंड समितीकडे पाठवण्यात आला आहे. समितीकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर हा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे हा प्रस्ताव पास झाल्यास पुणेकरांच्या डोक्याचा ताप कमी होईल.

News Title: Pune Metro parking issue solved

महत्त्वाच्या बातम्या-

SBI Green FD | SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

Rakhi Sawant चा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

Ram Mandir | रामाच्या सासरवाडीवरुन बोलवले 21 हजार पुजारी, या गोष्टीची मोठी तयारी सुरु

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत घर आणि जमिनीच्या खरेदी विक्रीत मोठी वाढ, किंमती ऐकाल तर थक्क व्हाल

Pune Metro तब्बल 36 मिनिटे बंद राहिली, कारण ऐकाल तर तुम्ही सुद्धा थक्क व्हाल