पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune News l पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुण्यात देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने विविध कामे हाती आहेत. त्यामुळे पुण्यात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.

पुण्यात ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार :

पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, पर्वती एलएलआर परिसर तसेच वारजे जलकेंद्रच्या अंतर्गत असलेल्या गांधी भवन टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (एमएलआर) टाकी परिसर, चांदणी चौक टाकी, चतुः श्रृंगी टाकी परिसरात पाणीपुरवठा बंद असणार आहे.

याशिवाय एस.एन.डी.टी. (एचएलआर) टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र रॉ वॉटर पंपिग व त्या अंतर्गत ठाकरसी, बेकरहील, हायसर्व्हिस, रामटेकडी, रेसकोर्स यासह खराडी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र व चिखली जलशुद्धीकरण केंद्र परिसरात शुक्रवारी म्हणजेच उद्या 24 मे ला पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे.

Pune News l जलशुद्धीकरण केंद्रांवर नागरी आणि विद्युत कामांचे नियोजन :

यासंदर्भात पाणी विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी प्रेस नोट जारी करून माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “पुणे महानगरपालिकेने (PMC) काही पाण्याच्या टाक्या आणि जलशुद्धीकरण केंद्रांवर नागरी आणि विद्युत कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी म्हणजेच 24 मे ला अनेक भागांना पाणीपुरवठा होणार नाही.

शुक्रवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांनी पुरेशा प्रमाणात पाण्याचा साठा करून ठेवावा, जेणेकरून गैरसोय होणार नाही. तसेच पुणे महानगरपालिकेने दिलेल्या सर्व भागातील नागरिकांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

News Title : Pune News Water supply will be off on May 24

महत्त्वाच्या बातम्या-

पुणे अपघातातील आरोपीने आमदाराच्या मुलालाही दिला होता त्रास, आईच्या आरोपांनी खळबळ

पुण्यातील कार अपघातातील अग्रवाल कुटुंबीयांचं थेट अंडरवर्ल्ड कनेक्शन? नेमकं प्रकरण काय

‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी, मिळणार पैसाच पैसा

‘माझ्या मुलाने असं काही केलं असतं तरी…’; पुण्यातील अपघातावर अजित पवार स्पष्टच बोलले

हातात दारूचा ग्लास अन्…; अपघाताआधीचा पबमधील व्हिडीओ आला समोर