पुणे अपघातातील आरोपीने आमदाराच्या मुलालाही दिला होता त्रास, आईच्या आरोपांनी खळबळ

Pune News l पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा भरधाव वेगाने पोर्शे कारने धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचे निधन झाले आहे. अशातच पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.

सोनाली तनपुरे यांनी दिली धक्कादायक माहिती :

अशातच आता याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे अपघातातील आरोपीने आमदाराच्या मुलालाही त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की,आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. पुणे पोर्शे कार प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल आणि माझा मुलगा एकाच वर्गात शिकत होते. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार देखील मी त्यांच्या पालकांकडे केली होती.

मात्र योग्य तो प्रतिसाद मला मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलाची शाळा बदलली. त्या घटनेचा वाईट परिणाम आजची माझ्या मनावर होत असल्याचं सोनाली तनपुरे यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे. तसेच वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित आज घडलाच नसता, असे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे ट्विटरच्या माध्यमातून म्हणाल्या आहेत.

Pune News l पीडित कुटुंबांना न्याय मिळायला हवा :

सोनाली तनपुरे यांनी ट्विटमध्ये असाही उल्लेख केला आहे की, त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बाली गेला आहे. त्यांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे या कुटुंबांना न्याय मिळायला हवा असे त्या म्हणाल्या आहेत. मात्र आता या सर्व प्रकरणावर राज्य सरकार काय निर्णय घेताय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुणे अपघातात पोलिसांना अजून एक महत्वाची माहिती मिळाली आहे. वेंदात अग्रवालचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड छोटा राजनशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे त्यांच्या भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात त्यांनी छोटा राजनची मदत घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं कुठपर्यंत आहे याचा सखोल तपास पुणे पोलीस करत आहेत.

News Title : Sonali Tanpure big statement on Vedant Agarwal Car accident

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यातील कार अपघातातील अग्रवाल कुटुंबीयांचं थेट अंडरवर्ल्ड कनेक्शन? नेमकं प्रकरण काय

‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी, मिळणार पैसाच पैसा

‘माझ्या मुलाने असं काही केलं असतं तरी…’; पुण्यातील अपघातावर अजित पवार स्पष्टच बोलले

हातात दारूचा ग्लास अन्…; अपघाताआधीचा पबमधील व्हिडीओ आला समोर

सचिन तेंडुलकरवर गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा इशारा, म्हणाले…