पुण्यातील कार अपघातातील अग्रवाल कुटुंबीयांचं थेट अंडरवर्ल्ड कनेक्शन? नेमकं प्रकरण काय

Pune News l पुण्यातील कल्याणीनगर भागात दारूच्या नशेत गाडी चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. अशातच आता याप्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल अग्रवालच्या कुटुंबीयांचे छोटा राजनसोबत संबंध असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

वेदांतच्या आजोबांचे छोटा राजनसोबत कनेक्शन :

वेदांत अग्रवालच्या आजोबांनी भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात छोटा राजनची मदत घेतली होती अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये वेदांतचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं देखील समोर आलं आहे.

मात्र या प्रकरणात त्यावेळी पोलिसांनी मोक्का लावणं अपेक्षित असनाताही केवळ आयपीसीची कलमं लावून सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यावेळी आरोपपत्र दाखल करेपर्यंत सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक झाली नव्हती अशी माहिती पोलिसांना तपासात समोर आली आहे.

Pune News l नातवाची हमी देण्यासाठी आलेल्या आजोबाचे अंडरवर्ल्ड संबंध :

वेदांत अग्रवालची हमी देण्यासाठी आलेल्या त्याच्या आजोबांचे म्हणजेच सुरेंद्र अग्रवालांचे संबंध हे थेट अंडरवर्ल्ड छोटा राजनशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. सन 2007-08 च्या काळातील एक प्रकरण समोर आलं आहे. मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणं CBI कडे हस्तक्षेप करण्यात आली होती. त्यामध्ये या प्रकरणाचा देखील समावेश आहे.

यासंदर्भात सुरेंद्र अग्रवाल यांनी छोटा राजनचा हस्तक असलेल्या विजय तांबटची बँकॉक येथे जाऊन भेट घेतली होती. भावासोबत असलेल्या संपत्तीच्या वादात राजनने आपल्याला मदत करावी अशी मागणी सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी केली होती. त्यानंतर अजय भोसले या व्यक्तीच्या खुनाच्या प्रयत्नात त्यांच्यावर गुन्हा दाखल देखील करण्यात आला होता. तसेच त्या प्रकरणात पोलिसांनी मोक्का लावणे अपेक्षित असताना फक्त आयपीसी कलम लावण्यात आले होते. तसेच चार्जशीट दाखल होईपर्यंत सुरेंद्र अग्रवाल यांना अटक देखील करण्यात आली नव्हती.

News Title : Underworld connection of Agarwal family in Pune car accident

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी, मिळणार पैसाच पैसा

‘माझ्या मुलाने असं काही केलं असतं तरी…’; पुण्यातील अपघातावर अजित पवार स्पष्टच बोलले

हातात दारूचा ग्लास अन्…; अपघाताआधीचा पबमधील व्हिडीओ आला समोर

सचिन तेंडुलकरवर गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा इशारा, म्हणाले…

‘…तर सगळे पब, बार बंद करा’; देवेंद्र फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश