शरद पवारांचा मोठा दावा, ‘या’ बड्या नेत्याचं टेंशन वाढलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | हिवाळी अधिवेशनानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र आलेले दिसतील असं वक्तव्य अनिल पाटलांनी नुकतंच केलं. माढा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी पवारांना पाटलांच्या या वक्तव्याबाबत विचारलं असता पवारांनी अनिल पाटील (Anil Patil) यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

मी हे सांगू इच्छितो, त्यांच्या मतदारसंघात (अमळनेर, जळगाव) मी जाऊन आलो. पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाहीत. त्याची आम्ही काळजी घेऊ, असं शरद पवार म्हणालेत.

माढ्यातील कापसेवाडी (Kapsewadi) इथं कृषी निष्ठ परिवाराच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला शरद पवारांनी उपस्थिती लावली. त्याआधी शरद पवारांनी माध्यमांशी चर्चा करताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

सोलापूर (Solapur) आणि माढा (Madha) अशा दोन्ही लोकसभा मतदार संघात आमची महायुती जिंकेल, असा विश्वास यावेळी शरद पवारांनी व्यक्त केला.

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. चार राज्यातील निवडणुकीत भाजपला दणका बसेल. माझ्या हयातीत पंतप्रधान कधी राज्यातील नेत्यांवर वैयक्तिक टीका करताना मी पाहिले नव्हतेय. मात्र आता ते नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) करत आहेत. प्रधानमंत्री सांगतात ज्या गोष्टी त्या पद्धतीचं राजकारण कधी पाहिलं नाही, असं पवार म्हणालेत.

मोदींसारखे पहिलेच प्रधानमंत्री पाहिले जे कुठल्याही राज्यात गेले की व्यक्तिगत हल्ले करतात. व्यक्तिगत हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे, असं शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

अजित पवार गोविंदबागेतल्या दिवाळीसाठी का आले नाहीत?, सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

मनोज जरांगेंची ताकद वाढली, उचललं मोठं पाऊल 

“मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रकार थांबवला नाही तर…”; जरांगे सरकारवर भडकले

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारने घतेला ‘हा’ मोठा निर्णय

“मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवतो”