अजित पवार गोविंदबागेतल्या दिवाळीसाठी का आले नाहीत?, सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

मुंबई | दरवर्षीप्रमाणे यंदाही पवार कुटुंबीय दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. बारामतीच्या गोविंद बागेत मंडप घालण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) स्वत: कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक आणि नेत्यांना भेटत आहेत.

दरवर्षी पाडव्याच्या सकाळी गोविंद बागेत हा कार्यक्रम होतो. यावर्षीचा पाडवा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेगळा आहे. कारण काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे.

सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

गोविंदबाग या शरद पवारांच्या बारामतीतल्या निवासस्थानी शरद पवार (Sharad Pawar) आणि इतर पवार कुटुंबीय जमले आहेत मात्र अजित पवार आलेले नाहीत. यामागचं कारण सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आहे.

दादाला डेंग्यू झाला आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मागचे 20 ते 25 दिवस दादा कुठल्याच कार्यक्रमांना गेलेला नाही. रणजीत पवार आहेत आणि इतरही भाऊ आहेत. मला असं वाटतं की जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे, असं ते म्हणालेत.

माझ्यासाठी माझ्या माझ्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. प्रत्येक जण आपली तब्बेत, जबाबदाऱ्या सांभाळतो आहे. आज रोहितही इथे आलेला नाही. तो संघर्ष यात्रेसाठी बीडला आहे रोहितचा आम्हा सगळ्यांनाच सार्थ अभिमान आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मनोज जरांगेंची ताकद वाढली, उचललं मोठं पाऊल 

“मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रकार थांबवला नाही तर…”; जरांगे सरकारवर भडकले

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारने घतेला ‘हा’ मोठा निर्णय

“मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवतो”

पुणेकरांनो काळजी घ्या! चिंताजनक बातमी समोर