पुणेकरांनो काळजी घ्या! चिंताजनक बातमी समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | राज्यात सगळीकडे दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी होतानाचं चित्र पहायला मिळत आहे. दरवर्षी पेक्षा यंदा राज्यातील काही लोक अतिउत्साहमध्ये दिवाळीचा आनंद लुटत असताना दिसत आहेत, मात्र फटाक्यांमुळे हवेतील प्रदुषणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.

काय आहे नेमकं प्रकरण ?

गेले काही दिवस राज्यात अति प्रदुषणामुळे अनेक शहरात हवेची गुणवत्ता ढासळताना दिसत आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर आणि नाशिक या सारख्या शहरात आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्यास सांगितली आहे. दरम्यान रविवारी त्यात फटाक्यांच्या धुराची भर पडली.

लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी पुणे येथील शिवाजीनगर परिसरातील हवेची गुणवत्ता अतिवाईट, तर कोथरूड, पिंपरीमधील भूमकर चौक, निगडी, भोसरीमध्ये हवेचा दर्जा वाईट नोंदवण्यात आला.

आसमंतामध्ये फटाक्यांच्या रोषणाईबरोबरच धुराचे लोटही पाहायला मिळाले. आवाजाच्या फटाक्यांच्या बरोबरीने नागरिकांनी फॅन्सी, रोषणाईचे फटाके वाजविल्याने हवा प्रदूषण वाढले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने वायू प्रदूषणात मोठी घट झाली. शनिवारी मध्यवर्ती पुण्यासह उपनगरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक चांगली आणि समाधानकारक या श्रेणीत पोहोचला होता. मात्र रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली आहे.

थोडक्यात बातम्या –

“एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत, नाही तर त्यांची औकात काय?”

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गौतमी पाटीलचा जलवा, ठाणेकरांना म्हणाली… 

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

शरद पवार मराठा की ओबीसी?; पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतला मोठा निर्णय!