पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येतीबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. या वेळी डाॅक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची माहिती सांगितली.
पवारांच्या प्रकृतीबाबत काय म्हणाले डाॅक्टर?
दिवाळी सणाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब दरवर्षी बारामतीत असतं. यंदाही पवार कुटुंब बारामतीत आलं आहे. आज सकाळी 10 वाजता अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या ठिकाणी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
कार्यक्रमावेळी शरद पवारांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी त्यांच्या कन्या म्हणजेच सुप्रिया सुळे यांनी या गोष्टीची कल्पना दिली. दरम्यान शरद पवार यांच्या प्रकृतीची डाॅक्टरांनी तपासणी केली असता, पवारांना विश्रांतीची गरज आहे, असं डाॅक्टरांनी सांगितलं.
त्यानंतर आज सकाळी डॉक्टरांकडून पवार यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर तब्येत स्थिर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शरद पवार पुन्हा नागरिकांना भेटत आहेत.
शिवाय पवारांना अचानक कशामुळे अस्वस्थ वाटू लागलं या मागचं कारण देखील डाॅक्टरांनी सांगितलं. माध्यमांशील बोलत असताना डाॅक्टर म्हणाले का, सततच्या कार्यक्रमामुळे आणि विश्रांती न घेतल्यामुळे शरद पवार यांना थकवा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
थोडक्यात बातम्या-
शरद पवार मराठा की ओबीसी?; पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतला मोठा निर्णय!
सोनं झालं स्वस्त; वाचा आजचे दर