मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतला मोठा निर्णय!

छत्रपती संभाजीनगर | मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण केलं होतं. त्यानंतर अनेक राजकीय मंडळींनी त्यांची भेट घेतली आणि उपोषण मागे घेण्यास सांगितलं.

जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी देखील ते डिसेंबर पासून राज्य दौरा सुरु करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता जरांगे पाटील यांनी एक ऐन दिवाळीच्या सणाला मोठी घोषणा  केली आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

माध्यमांशी बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले की, “मला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतोय. मी आज जालन्यातील अंतरवली सराटीत जाणार आहे. गावात जाईल. पण घराचा उंबरठा ओलांडणार नाही. जोपर्यंत मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी घराच्या उंबऱ्यावर पाय ठेवणार नाही, असं सांगतानाच यंदा मी दिवाळीही साजरी करणार नाही.”

माझ्या बांधवांनी आत्महत्या केलेल्या असताना आणि त्यांच्या घरात अंधार पसरलेला असताना मी दिवाळी कशी साजरी करू?, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे.

मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि समाजाची एकजूट करण्यासाठी 15 ते 23 तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण आणि परत मराठवाडा अशा माझ्या गाठीभेटी असणार आहेत. माझी तब्येत ठणठणीत आहे.

मी आता अंतरवलीला निघालोय. पण घराकडे जाणार नाही. दिवाळी साजरी करणार नाही. मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या, दु:खाचं सावट आहे. त्यामुळे आनंद कसा साजरा करणार? त्यामुळे वैयक्तिक दिवाळी साजरी करणार नाही.

थोडक्यात बातम्या- 

सोनं झालं स्वस्त; वाचा आजचे दर

अभिजीत बिचुकलेंचं शिंदेंना पत्र, केली मोठी मागणी 

“मर्दाची अवलाद असेल तर…”; उद्धव ठाकरे भडकले

मुकेश अंबानींनी बायको नीता अंबानींना दिलं ‘हे’ सर्वात महागडं गिफ्ट!

‘त्या भेटीत अनेक…’; अपक्ष आमदाराचा मोठा गौप्यस्फोट