शरद पवार मराठा की ओबीसी?; पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना वेगळ्याच प्रकारे ट्रोल केलं जात आहे. अशात शरद पवार यांनी ओबीसींचं सर्टिफेकट घेतल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत होता. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) हे ओबीसी झाल्याचा दावा केला जात होता.

शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल

शरद पवार (Sharad Pawar) यांचे समर्थक विकास पासलकर यांनी पवार (Sharad Pawar) यांचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला दाखवत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. शरद पवार यांनी ओबीसींचं सर्टिफिकेट घेतलं नसल्याचा दावाही विकास पासलकर यांनी केला आहे.

शरद पवारांचं बारामतीत शिक्षण झालं आहे. एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जातं. या षडयंत्रकारी लोकांना कोणी तरी रसद पुरवते. हा षडयंत्राचा भाग आहे, असं विकास पासलकर यांनी सांगितलंय.

पवार साहेबांच्या शाळेच्या दाखल्यावर काय लिहिलंय ते तुम्हीच पाहा. हा घ्या पुरावा. पवार मराठा असल्याचा हा धडधडती पुरावा आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांला बदनाम करण्याचं व्हिटॅमिन कुठून येतं? नागपूर सेंटरकडूनच हे व्हिटॅमिन पुरवलं जातंय, असा आरोप विकास पासलकर यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जोरदार आंदोलने सुरू आहेत. दोन्ही समाज आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतला मोठा निर्णय!

सोनं झालं स्वस्त; वाचा आजचे दर

अभिजीत बिचुकलेंचं शिंदेंना पत्र, केली मोठी मागणी 

“मर्दाची अवलाद असेल तर…”; उद्धव ठाकरे भडकले

मुकेश अंबानींनी बायको नीता अंबानींना दिलं ‘हे’ सर्वात महागडं गिफ्ट!