मुंबई | दिवाळी आली फुसका बार आला आणि वाजलाच नाही. सर्व कार्यकर्त्यांचा फटाक्यांच्या आवाज होता त्यांना यु टर्न घ्यायला लागला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
फुसका बार आला वाजला नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्राप्रकरणात लगावला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माज उतरवणाऱ्यांना सातव्या नंबरवर पाठवलं. उद्या दहाव्या नंबरवरही जातील. लोकं त्यांना कामातून उत्तर देतील, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर चढवला.
काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. शेवटी कुठलंही काम होणार नाही हे सांगायला काही स्किल लागत नाही. मात्र न होणारं काम सांगायला स्किल लागतं, धाडसं तर लागतंच. पण जेव्हा आपला हेतू स्पष्ट असतो, चांगला असतो त्यावेळी कधीही घाबरायचं नसतं, असं ते म्हणालेत.
ज्यावेळी आपला वैयक्तिक फायदा नसतो आणि जनतेचा फायदा असतो त्यावेळी बिनधास्त करायचं असतं, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या 40 वर्षांपासूनची मुंब्र्यातील शाखा गेल्या आठवड्यात अतिक्रमणाच्या आरोपाखाली पाडण्यात आली. या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे स्वत: मुंब्र्यात आले. उद्धव ठाकरेंनी या शाखेजवळ जाण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. पण उद्धव ठाकरे यांना 10 मीटर लांबूनच या शाखेच्या जागेची पाहणी करता आली.
उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. ठाकरे गटाचे अनेक दिग्गज नेते या शक्तिप्रदर्शनात सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे स्वत: मुंब्र्याला आल्यामुळे या घटनेला सर्वात जास्त महत्त्व प्राप्त झालं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतला मोठा निर्णय!
सोनं झालं स्वस्त; वाचा आजचे दर