“एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत, नाही तर त्यांची औकात काय?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेनेचा बार गेल्या 50 वर्षापासून बाळासाहेब ठाकरेंपासून उडत आहे. भाजपने तुमचा बार कधीच उडवलाय. तो आधी बघा, असा पलटवार खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलाय. संजय राऊत मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केलीये.

“नाही तर शिंदेंची औकात काय”

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. नाही तर त्यांची औकात काय? राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसवले गेले आहेत. शिवसेनेला तोडण्याचं भाजपचं जुनं स्वप्न आहे. मिंधे गटाला फोडूनही त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत नाहीये, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री नसाल तेव्हा तुमचा बार वरून उडेल का खालून उडेल ते बघा. 31 डिसेंबरनंतर तुम्ही मुख्यमंत्रीपदी नसाल. मग तुम्ही कोणत्या बारमध्ये आहात ते कळेल, असं ते म्हणाले.

दिल्लीतील भाजपच्या चरणदासांनी महाराष्ट्राची, मराठी माणसाची बेअब्रू केली आहे. त्यांनी शिवसेनेला ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नये. मुंबईमध्ये आम्ही हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. पोलीस आले होते. आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही संयमाने घेतलं. त्यामुळे नक्कीच संघर्ष टळला, असं संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांवर भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करत होती. आता हेच लोक भाजपचे प्रचारक आहे का? सत्ता, पैसा आणि उद्योग हाच भाजपचा विचार आहे. लोकांना गुलाम बनवणे हा भाजपचा विचार आहे, अशी टीका त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गौतमी पाटीलचा जलवा, ठाणेकरांना म्हणाली… 

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

शरद पवार मराठा की ओबीसी?; पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतला मोठा निर्णय!