‘आमच्या हातात कोयता आहे’; ‘या’ नेत्याचा जरांगेंना इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा समाजाला ओबीसमधून सरसकट आरक्षण देऊ नयेत या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे समहाराष्ट्रातील सर्वच मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र, त्यांच्या याच मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. तर, हाच विरोध दर्शवण्यासाठी आज अंबडमध्ये ओबीसींची जाहीर सभा होत आहेभा होत आहे.

सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी बालहट्ट सोडा, आमच्या हातात कोयता आहे, असं म्हणत OBC नेते आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. यावेळी प्राध्यापक टी पी मुंडे यांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.

जरांगे जास्त बोलू नका, आमच्या हातात कोयता आहे. लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे. जरांगे नावच बाटूक आणि त्याच्या मागच्या लोकांना बघायचं आहे. त्यामुळे, भुजबळ यांच्या मागे ओबीसी समाज आहे, असं प्राध्यापक टी पी मुंडे म्हणालेत.

ओबीसी सभास्थळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), महादेव जानकर (Mahadev Jankar), पोहोचले आहेत. त्यामुळे या सभेकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सुरुवात जालन्यातील आंतरवाली सराटी गावातून झाली. आता ओबीसींची सभा देखील जालना जिल्ह्यातच होत आहे. विशेष म्हणजे आंतरवाली सराटी गावापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर ही सभा होत आहे.

मनोज जरांगे यांच्याच बालेकिल्ल्यात सभा घेऊन, मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचा संदेश ओबीसींकडून देण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शरद पवारांचा मोठा दावा, ‘या’ बड्या नेत्याचं टेंशन वाढलं

अजित पवार गोविंदबागेतल्या दिवाळीसाठी का आले नाहीत?, सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

मनोज जरांगेंची ताकद वाढली, उचललं मोठं पाऊल 

“मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रकार थांबवला नाही तर…”; जरांगे सरकारवर भडकले

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारने घतेला ‘हा’ मोठा निर्णय