‘तुझं खातोय का रे…’; छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

जालना | राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ओबीसी आमचं आरक्षण खातात, असा दावा मनोज जरांगे (Manoj jarange) करत आहेत. त्यावरही त्यांनी पलटवार केला. तुझं खातोय का रे?, असा सवालच छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी केला.

जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी समाजाच्या एल्गार परिषदेला छगन भुजबळ (chhagan bhujbal) संबोधित करत होते. भाषणाच्या सुरुवातीलाच छगन भुजबळ यांनी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आठवण काढली.

आज गोपीनाथ मुंडे नाहीत. ते असते तर ही संकटे आमच्यावर आली नसती. दैवाचा दुर्विलास. गोपीनाथरावांनी ज्यांना ज्यांना ओबीसींसाठी लढण्याची दीक्षा दिली आहे, त्यांना सोबत घेऊन आपण लढा लढायचं आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

मंडल आयोगाने जेव्हा आरक्षण दिलं. तेव्हाही काही लोक कोर्टात गेले. सर्वोच्च न्यायालयात नऊ जज बसले होते. माजी न्यायामूर्ती पीबी सावंतही त्यात होते. यावेळी कोर्टाने ओबीसींचा मुद्दा बरोबर असून त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, असं सांगितलं. त्यानंतर ओबीसीत 201 जातींचा समावेश केला. सुप्रीम कोर्टाच्य़ा शिक्क्यानिशी हा समावेश झाला. त्यानंतर त्याचा जीआर निघाला. हे असंच मिळालं का? कुणाचं खाताय कुणाचं खाताय… तुझं खातोय का र?, असा सवाल भुजबळ यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर एकाही नेत्याला गावात फिरकू देणार नाही, अशी भूमिका मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावर छगन भुजबळ यांनी निशाणा साधला.

गावात नेत्यांना गावबंदी करता काय महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर आहे काय?, असा सवाल भुजबळांनी केला. यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल, असं छगन भुजबळ म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांचा मोठा दावा, ‘या’ बड्या नेत्याचं टेंशन वाढलं

अजित पवार गोविंदबागेतल्या दिवाळीसाठी का आले नाहीत?, सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

मनोज जरांगेंची ताकद वाढली, उचललं मोठं पाऊल 

“मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रकार थांबवला नाही तर…”; जरांगे सरकारवर भडकले