‘महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय?’, भुजबळ मराठ्यांवर संतापले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | आमदार, मंत्र्यांना गावबंदी, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय रे?, असा सवाल करत मंत्री छगन भुजबळांनी मराठा समाजावर टीका केली आहे.

जालनाच्या अंबड तालुक्यात ओबीसी नेत्यांची मोठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी भाषण केलं. छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली.

आमच्या राज्यकर्त्यांना काय सांगायचं, एक दिवस आलं, परत सगळं बंद झालं. पोलिसांची बाजू आलीच नाही. एकच बाजू आली की, पोलिसांनी लाठीचार्ज केला. महिला पोलिसांवर हल्ला झाला मग करायचं काय? लष्कर भी तुम्हारा, सरदार भी तुम्हाला है, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है, इस दौर के फर्यादी जाए तो जाए कहाँ, अभी राज्य भी तुम्हारा और दरबार भी तुम्हारा हैं, असं छगन भुजबळ म्हणालेत.

लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार घरात जावून पळून झोपले. यांना हे अंबडचे आमचे मित्र टोपे साहेब, दुसरे आमचे मित्र रोहित पवार, त्यांना घरातून रात्री तीन वाजता घेऊन आले. म्हणाले, बस तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येणार आहेत. पण यांनी शरद पवारांना हे नाही सांगितलं की, लाठीचार्ज का झाला? शरद पवारांना आम्ही आजही उत्कृष्ठ प्रशासक समजतो, असं भुजबळ म्हणाले.

भाषणाच्या सुरुवातीलाच छगन भुजबळ यांनी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आठवण काढली.आज गोपीनाथ मुंडे नाहीत. ते असते तर ही संकटे आमच्यावर आली नसती, असं ते म्हणालेत.

दैवाचा दुर्विलास. गोपीनाथरावांनी ज्यांना ज्यांना ओबीसींसाठी लढण्याची दीक्षा दिली आहे, त्यांना सोबत घेऊन आपण लढा लढायचं आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘तुझं खातोय का रे…’; छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

शरद पवारांचा मोठा दावा, ‘या’ बड्या नेत्याचं टेंशन वाढलं

अजित पवार गोविंदबागेतल्या दिवाळीसाठी का आले नाहीत?, सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

मनोज जरांगेंची ताकद वाढली, उचललं मोठं पाऊल 

“मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रकार थांबवला नाही तर…”; जरांगे सरकारवर भडकले