वर्ल्डकप फायनलआधी राज ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका, विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकांसाठी मनसेने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) विविध विषयांवर भाष्य केलं.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देशात सुरू असलेल्या वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका, आगमी लोकसभा निवडणूक आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न विचारण्यात आले.

निवडणूक काळात पक्ष मतदारांना वेगवेगळी अमिषं दाखवत आहेत. परंतु, निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षांवर आक्षेप घेतोय असं बोललं जात आहे. त्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राजर ठाकरे यांनी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं उदाहरण दिलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गंमतीत म्हणाले, विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार आहे. तर आज उपांत्य फेरीतला दुसरा सामना सुरू होणार आहे. त्या दोन संघांपैकी जिंकेल तो संघ अंतिम सामन्यात भारताविरोधात खेळेल. मला वाटतंय, बहुदा त्यांच्यापैकी जिंकेल त्या संघाला सांगतील, साहबने बोला हैं हारने को, असंही सांगितलं जाऊ शकतं.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर त्यांना विचारण्यात आलं की, भारताने यंदाचा विश्वचषक जिंकणं हा आगामी निवडणूक जिंकण्याच्या रणनीतिचा भाग असू शकतो का? त्यावर राज ठाकरे म्हणाले, नाही, लोकसभेच्या निवडणुका अद्याप खूप लांब आहेत.

जनता चांद्रयानच्या बातम्या विसरली. लोकसभा निवडणुकीपर्यंत लोक विश्वचषक स्पर्धा विसरतील. रोज इतक्या बातम्या आपण पाहतो, आपल्या मोबाईलवर इतक्या बातम्या दिसतात की लोकांना हे सगळं लक्षात ठेवायला वेळ नाही, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय?’, भुजबळ मराठ्यांवर संतापले 

‘तुझं खातोय का रे…’; छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

शरद पवारांचा मोठा दावा, ‘या’ बड्या नेत्याचं टेंशन वाढलं

अजित पवार गोविंदबागेतल्या दिवाळीसाठी का आले नाहीत?, सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

मनोज जरांगेंची ताकद वाढली, उचललं मोठं पाऊल