मुंबई | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. खडसे यांना मोठ्या रकमेच्या दंडाची नोटीस आली आहे. केवळ खडसेच नाही तर खडसे कुटुंबाला ही नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी खडसे कुटुंबीयांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनाही ही नोटीस बजावण्यात आल्याचं कळतंय.
मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत या अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. सातोर शिवारात 1 लाख 18 हजार ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी एसआयटीची स्थापना केली होती.
दरम्यान, या नोटिशीला एकनाथ खडसे अथवा रक्षा खडसे यांनी अद्याप दुजोरा दिला नाही. या प्रकरणी ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘उद्धव ठाकरेंना अटक करा’; ‘या’ नेत्याने केली मागणी
- एकनाथ शिंदेंना धक्का देणारी बातमी समोर; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
- राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा मोठा समझोता!
- ‘ती’ एक चूक अन् ललित पाटील पोलिसांच्या जाळ्यात फसला!
- ‘त्या 2 नेत्यांची नार्को टेस्ट करा’; सुषमा अंधारेंचा धक्कादायक आरोप