Virat Kohli | भारतात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने झाले असून यजमान भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मायदेशात होत असलेल्या या कसोटी मालिकेला भारताचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली मुकला. त्याने वैयक्तिक कारणास्वत माघार घेतली आहे. मात्र, किंग कोहलीचे वैयक्तिक कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. यावरून क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे.
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा काही दिवसातच दुसऱ्यांदा बाळाला जन्म देणार असल्याची चर्चा आहे. अलीकडेच काहींनी विराटच्या आईची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले होते. अशातच आता प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी अनुष्काचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
‘विरुष्का’ दुसऱ्यांदा होणार आई-बाबा?
अनुष्काचा बेबी बंप दिसल्याची चर्चा होती, त्यामुळे अनुष्का लवकरच आई होणार असल्याचे बोलले जात होते. विराट-अनुष्काने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. अनुष्का भारतात नाही तर परदेशात मुलाला जन्म देणार असल्याचे समोर आले आहे. विराट आणि अनुष्का दोघेही मागील काही दिवसांपासून सोशल मीडियापासूनही दूर आहेत. त्यामुळे ते दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
हर्ष गोएंका यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, काही दिवसांतच एका नवीन बाळाचा जन्म होईल. आशा आहे की हे बाळ आपल्या वडिलांप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात चमक दाखवेल किंवा आईसारखा फिल्मस्टार बनेल? खरं तर यासोबतच गोएंका यांनी अप्रतिम हॅशटॅगचाही वापर केला. गोएंका यांनी मेड इन इंडिया आणि टू बी बॉर्न इन लंडन हे हॅशटॅग वापरले आहेत.
A new baby is to be born in the next few days! Hope the baby takes India to great heights like the greatest cricketing father. Or will it follow the mother and be a film star? #MadeInIndia #ToBeBornInLondon
— Harsh Goenka (@hvgoenka) February 13, 2024
Virat Kohli ची कसोटी मालिकेतून माघार
विराट आणि अनुष्काची पहिली भेट 2013 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. विराटने नंतर एका मुलाखतीत सांगितले की, अनुष्काला भेटल्यानंतर तो खूप घाबरला होता. जाहिरातीचे शूटिंग संपल्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. 2014 मध्ये ते दोघे न्यूझीलंडमध्ये एकत्र सुट्टी घालवताना दिसले होते. त्यांचे लग्न 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये झाले. यानंतर जानेवारी 2021 मध्ये अनुष्काने एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव वामिका आहे.
विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध भारतात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. पहिल्या दोन सामन्यांपूर्वी तो संघासोबत सराव करत होता, मात्र पहिला सामना सुरू होण्याच्या दोन दिवस आधी त्याने पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली. त्यावेळी त्याने वैयक्तिक कारण दिले होते. मात्र, हे वैयक्तिक कारण काय आहे, याचा खुलासा झालेला नाही. तिसऱ्या कसोटीत तो खेळेल अशी अपेक्षा होती, मात्र उर्वरित कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर होण्यापूर्वीच त्याने संपूर्ण मालिकेतून माघार घेतली.
News Title- Businessman Harsh Goenka has claimed that Team India player Virat Kohli and Anushka Sharma are going to be parents for the second time
महत्त्वाच्या बातम्या –
दीपिका पादुकोणने पुन्हा वाढवली भारताची शान; लंडनमधील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा गाजवला
पुरुषांमध्ये ‘हे’ 3 गुण असतील तर महिला होतात आकर्षित, चाणक्यांनी ठेवलंय लिहून
मोठी बातमी! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
iPhone वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
‘नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून द्यायचं आहे, त्यामुळे…’; अजित पवारांचं मोठं वक्तव्य