कॉँग्रेसला मोठा धक्का बसणार?; ‘हा’ नाराज नेता फडणवीसांच्या भेटीला, चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aaba Bagul | राजकीय वर्तुळात सध्या नाराजीचे सत्र दिसून येत आहे. भाजपासह महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्येही उमेदवारी न मिळाल्याने नाराजी दिसून येत आहे. अशात पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना तिकीट देण्यात आलंय. तर, भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांचं आव्हान असणार आहे.

धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने कॉँग्रेस नेते आबा बागूल नाराज झाले आहेत. त्यांनी पुण्यातील कॉंग्रेस पक्ष कार्यालयासमोर आंदोलन देखील केलं होतं. तेव्हापासून आबा बागुल भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती.आता तर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा होत आहेत.

आबा बागूल फडणवीस यांच्या भेटीला

नागपुरात पोहोचल्यावर आबा बागुल यांना या संदर्भात प्रश्न करण्यात आला असता ते म्हणाले की, मी खासगी कामासाठी नागपुरला आलो आहे. आता जर आबा बागुल यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला तर काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना बागुलांच्या नाराजीचा किती फटका बसणार आहे? हे आगामी काळात दिसून येईलच.

बागूल कॉँग्रेसच्या अनेक बैठकांमध्येही अनुपस्थित राहिले आहेत. काही दिवसापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला आबा बागुल (Aaba Bagul ) गैरहजर होते. उमेदवारी न दिल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

बागुलांच्या नाराजीचा किती फटका बसणार?

‘पुण्यात 40 वर्षे काम केलेल्या पक्षातल्या निष्ठावंतांवर अन्याय झाला. निष्ठावंतांना न्याय नसेल, तर न्याय यात्रेचा उपयोग काय’, असा सवाल आबा बागुल यांनी केला होता. त्यामुळे आबा बागुल (Aaba Bagul ) यांची नाराजी ही उघड आहे.त्यांनी 5 वेळा कॉँग्रेसकडून नगरसेवक पद भूषविले आहे.

दरम्यान, पुण्यात वंचितकडून वसंत मोरे यांनी आव्हान दिलं आहे. त्यामुळे येथे आता तिरंगी लढत होईल. मविआकडून धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, भाजपाकडूनही मोहोळ यांचं तिकीट फिक्स आहे. आता बागूल यांनी बंडखोरी केली तर त्याचा धंगेकर यांना नेमका काय फटका बसणार?, याबाबत आगामी काळात पाहणं महत्वाचं ठरेल.

News Title : Aaba Bagul met Devendra Fadnavis  

महत्त्वाच्या बातम्या-

वरुण धवनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!

मारुती सुझुकी लवकरच बाजारात धुमाकूळ घालणार; ग्राहकांना मिळणार भन्नाट फीचर्स

कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार! रेल्वेमध्ये बंपर भरती सुरु; या तारखेपर्यंत करा अर्ज

एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा ‘या’ दिग्गज नेत्यावर हल्लाबोल

Oops… रोहितच्या एका हातात पँट तर एका हातात बॉल; रोहितसोबत घडली विचित्र घटना