इतक्या दिवसानंतर विवेक ओबेराॅयचा ऐश्वर्यासोबतच्या नात्यावर मोठा खुलासा

मुंबई| बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता विवेक ओबेराॅय(Vivek Oberoi) आणि अभिनेत्री ऐश्वऱ्या राय(Aishwarya Rai) यांच्या अफेर्सच्या एकेकाळी जोरदार चर्चा होत्या. कारण ऐश्वऱ्या सलमान खानसोबत(Salman Khan) ब्रेकअप झाल्यानंतर विवेकसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. परंतु 2003 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं. त्या काळी हे प्रकरण खूपच चर्चेत होतं.

आता इतक्या वर्षानंतर विवेकनं या प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे. नुकतंच त्याला ऐश्वर्याच्या आणि त्याच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी उत्तर देताना इतक्या वर्षानंतर मोठा खुलासा केला आहे.

विवेक म्हणाला आहे की, जेव्हा माझं ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झालं तेव्हा त्याचा माझ्या वैयक्तिक आयुष्यावर तर परिणाम झालाच पण फिल्मी करिअरवरही खूप परिणाम झाला होता. मी कित्येक दिवस रिकामा बसलो होता.

या प्रकरणामुळं मी इतके चांगले चित्रपच करूनही मला कोणीही काम देत नव्हतं. माझ्या आयुष्यातला तो काळ इतका वाईट होता की मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मी आत्महत्या करण्याचाही निर्णय घेतला होता, असंही विवेक यावेळी म्हणाला.

त्यावेळी बाॅलिवूडमध्ये फक्त पाच-दहा लोकांच वर्चस्व होतं. जर एखाद्याबद्दल काही गैरसमज असेल तर त्याला कोणी काम देत नव्हतं. पण आता ओटीटीमुळं परिस्थीती बदलली आहे. माझ्यासोबत जे घडलं त्याच्याबदद्ल माझ्या मनात वाईट काही नाही. कारण माझी पत्नी प्रियंका आणि आईचा खूप सपोर्ट आहे, असंही विवेक म्हणाला.

दरम्यान, सध्या विवेक धारावी बॅंक या वेबसिरीजमुळं चर्चेत आला आहे. या वेबसिरीजमध्ये सुनिल शेट्टी(Sunil Shetty) मुख्य भूमिकेत आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More