IPL 2024 | गुजरात-मुंबईमध्ये Hardik Pandyaचा लफडा, खरी लॉटरी लागली विराटच्या RCBला!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | IPL 2024 Auctionला आणखी काही दिवस शिल्लक आहेत, त्याआधीच IPL मध्ये मोठे बदल होताना पहायला मिळत आहे. IPL ने आपली ट्रेडिंग विंडो यावेळी ओपन केली होती. काही खेळाडूंना फ्रँचाईशींनी सोडून दिलं तर काहींना रिटेन केल्याचं पहायला मिळालं.

Hardik Pandya traded to Mumbai Indians

यंदाच्या आयपीएल ट्रेडिंग विंडोत सगळ्यात धक्कादायक बातमी ठरली हार्दिक पांड्याची… गुजरातने टायटन्सने थेट आपल्या कर्णधारालाच ट्रेड केलं. मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्या ताफ्यात सहभागी केलं. या गोष्टीची खेळाच्या वर्तुळात आता चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार, अशा आशयाच्या चर्चा क्रीडा जगतात यापूर्वी सुरु होत्या. कुणी त्याला अफवा म्हणत होतं तर कुणाला त्या खऱ्या वाटत होत्या, मात्र दोन मोसमामधील एकात थेट किताब तर दुसऱ्यात उपविजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिकला अखेर गुजरात ट्रेड केलंच.

गुजरात आणि मुंबईमध्ये हार्दिकचा ट्रेड सुरु होता. याचा फायदा RCBला झालेला पहायला मिळाला. गुजरातला हार्दिकला ट्रेड करायचं होतं, तर मुंबई इंडियन्सला त्याला विकत घ्यायचं होतं. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनूसार हार्दिकला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी मुंबईच्या पाकिटात पुरेसे पैसे नव्हते.

All Rounder Cameron Green has been traded to RCB

हार्दिकला पुन्हा संघात घेण्यासाठी मुंबईला आपल्या पाकिटात पैसे जमा करणे गरजेचे होते, तेही बाहेरुन नव्हे तर आपल्याच एखाद्या खेळाडूला ट्रेड करुन… अखेर मुंबई इंडियन्सला कठोर निर्णय घ्यावा लागला. आपला ऑलराऊंडर खेळाडू कॅमरुन ग्रीनला त्यांनी ट्रेड केलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं या गोष्टीचा फायदा घेतला, त्यांनी कॅमरुनला आपल्या संघात सहभागी करुन घेतलं. कॅमरुनला सोडल्याने मुंबईला देखील आपल्या पाकिटात पुरेसे पैसे जमा करता आले. याच पैशांचा वापर करुन त्यांनी हार्दिकला आपल्या संघात समाविष्ट केल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

Rain Update: धक्कादायक माहिती; अवकाळी पावसामुळे 20 जणांचा मृत्यू

Maharashtra Rain Update | सावधान! राज्याच्या ‘या’ भागात गारपीटासह मुसळधार पावसाचा इशारा

शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी समोर; ‘त्या’ दोन आमदारांची सुटका?

क्षणात होत्याचं नव्हतं झालं; देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात

“आम्हाला लग्न झालेल्या महिला आकर्षित करतात?”, चौघांनी सांगितल्या अत्यंत धक्कादायक गोष्टी