Rain Update: धक्कादायक माहिती; अवकाळी पावसामुळे 20 जणांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गुजरातमध्ये (Gujrat Rain) रविवारी अवकाळी पावसाने थैमान घातलं. गुजरातमध्ये रविवारी रात्री अवकळी पावसाने तूफान हजेरी लावली. यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीज कोसळल्यामुळे तब्बल 20 नागरिकांचा मृत्यू (Death) झाला आहे. (20 people died due to unseasonal rain)

गुजरातच्या दाहोद, भरूच, तापी अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर आणि देवभूमी द्वारका येथे वीज पडून नागरिकांचा मृत्यू झाला. सुरत, सुरेंद्रनगर, खेडा, तापी, भरूच आणि अमरेली जिल्ह्यांत 16 तासांत 50 -117 मिमी पाऊस झाला. त्यामुळे या गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. पटेल म्हणाले की, अधिकाऱ्यांना राज्याच्या नियमांनुसार नुकसानग्रस्त कुटुंबांना भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी रात्री ट्वि करत या घटनेबद्दल दुख: व्यक्त केले. ‘गुजरातमधील अनेक शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याने मी दु:खी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल मी शोक व्यक्त करतो, असे शहा यांनी लिहिले आहे. दरम्यान, आज सोमवारी पावसाचा जोर कमी होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे वाया गेलं आहे. नाशिकमध्ये कांद्यासह द्राक्षांच्या शेतीचे पावसाने नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शहरांमध्ये पाणीही साचलं आहे.

मुसळधार पावसामुळे ठाणे आणि पालघरमधील अनेक भागात विजांचा कडकडाट झाला. वीज कोसळल्यामुळे ठाण्यातील एका इमारतीला आग लागली. तर दुसरीकडे पालघरमध्ये एका रस्ता अपघाताने एका व्यक्तीचा जीव घेतला.

 

महत्त्वाच्या बातम्या-