लग्नानंतर करा फक्त ‘या’ गोष्टी, नवरा कायम राहील फक्त तुमचाच दिवाना!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवरा-बायको (Husband-Wife) मधील नातं हे परस्पर प्रेम (Love), विश्वासावर टिकतं. जेव्हा दोन लोक या नात्यात येतात. तेव्हा दोघांनी एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं. लग्नाच्या सुरुवातीला सर्व काही ठीक असतं. पण जसे जसे दिवस जातात तशा तक्रारी वाढत जातात.

जसजसा वेळ जातो तसतसे बायकोला वाटतं की तिच्या पतीचं तिच्यावरील प्रेम कमी झालं आहे. बहुतेक स्त्रिया आपल्या पतींना ‘तुम्ही बदलला आहात’ असं सांगत राहण्याचं हे देखील एक कारण आहे. जर तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगत आहोत ज्यामुळे तुमचा नवरा तर आनंदी होईलच पण आयुष्यभर तुमच्यासाठीच वेडा राहील.

भावनिक जवळीक-जिव्हाळ्याचा अर्थ फक्त शारीरिकदृष्ट्या जवळ असणं नाही तर भावनिक आणि मानसिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ असणं याचा अर्थ आहे. तुमच्या जोडीदारासोबत लैंगिक जवळीक वाढवणं खूप महत्वाचं आहे. पण जर तुमच्या नात्यात भावनिक जोड नसेल तर ते जास्त काळ टिकणं कठीण होऊन बसतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही तुमचे वैवाहिक जीवन पूर्वीसारखंच राहावं असं वाटत असेल, तर सर्वप्रथम तुमच्या पतीसोबत भावनिक जवळीक निर्माण करा.

एकमेकांची काळजी घ्या– ज्या जोडप्यांचं नातं एकमेकांच्या काळजीने भरलेलं असतं त्यांचं नातं नेहमीच घट्ट राहतं. जितके तुम्ही एकमेकांना समजून घ्याल तितके तुम्ही जवळ जाल. अशा परिस्थितीत तुम्ही एकमेकांशी बोलत राहणं आणि तुमच्या नात्यात दुरावा येण्याचं काही कारण आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणं सर्वात महत्त्वाचं आहे.

नवर्‍याची आवडती डिश बनवा-  नवऱ्यासाठी स्वतः स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा. त्याची आवडती डिश बनवा. यावरून त्याला कळेल की तुम्ही त्याला किती खास मानता. त्यामुळे त्यांचा तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. जरी त्याने हे उघडपणे सांगितलं नाही, तरीही तो हळूहळू तुमची काळजी घेऊ लागेल.

पर्सनल स्पेस द्या– जोडीदाराला बांधून ठेवू नका. त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला त्याची पर्सनल स्पेस द्या. प्रेम करणारी माणसं जोडीदाराला मुक्त ठेवतात.

कुणीतरी बरोबर म्हटलंय की जिव्हाळ्यानेच नाती तयार होतात आणि आपलं आयुष्य सुखी बनतं. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी भावनिकदृष्ट्या जोडले जाऊ शकत नाही, तेव्हा कुठेतरी नात्यात दुरावा निर्माण होतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘महिलांना पुरूषांची गरज असते कारण…’; नीना गुप्तांचं वक्तव्य चर्चेत

‘पेटवायला अक्कल लागत नाही’; छगन भुजबळ जरांगेंवर भडकले 

मुंबईतील सर्वात श्रीमंत भिकारी, संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल! 

थंडीत Heart Attack चा सर्वाधिक धोका; ‘या’ चूका करू नका 

Manoj Jarange | ‘या’ बड्या नेत्याचा सल्ला मनोज जरांगेंना मान्य!