मुंबईतील सर्वात श्रीमंत भिकारी, संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भिकारी हा शब्द मनात येताच मनात विचार येतो की ज्याचे फाटके कपडे असतील, ज्याचे केस विस्कटलेले असतील किंवा ज्याने बरेच दिवस आंघोळ केली नसेल. ज्यामुळे तो दिसायला कुरूप होईल. पण मुंबईत सध्या सर्वात श्रीमंत भिकारी चर्चेत आहे. मुंबईच्या रस्त्यावर भीक मागणाऱ्या या श्रीमंत भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती आहे. मुंबईतील परळ परिसरात 1.2 कोटी रुपयांचा फ्लॅट आणि ठाण्यात व्यावसायिक मालमत्ता असून, त्यातून दरमहा 30 हजार रुपये भाडे मिळतात.

जागतिक स्तरावर सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून ओळखले जाणारे भरत जैन मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना दिसत असले तरी त्यांच्या कुटुंबाचे राहणीमान खूपच चांगलं आहे. आर्थिक अडचणींमुळे भरत जैन यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही. इतकी वाईट परिस्थिती असतानाही भरत जैन यांनी लग्न केलं. आता त्याचं संपूर्ण कुटुंब आहे, ज्यात त्याची पत्नी, दोन मुले, त्याचा भाऊ आणि त्याचे वडील आहेत.

भरत जैन हे 7.5 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत

भरत जैन यांच्या मुलांनी मात्र यशस्वीरित्या त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मूळचे मुंबईचे असलेले भरत जैन यांची एकूण संपत्ती 7.5 कोटी रुपये ($१ दशलक्ष) आहे. भीक मागून त्यांची मासिक कमाई 60,000 ते 75,000 रुपये आहे.

मुंबईत 1.2 कोटी रुपयांचा फ्लॅट

भरत जैन यांच्याकडे मुंबईत 1.2 कोटी रुपयांचा दोन बेडरूमचा फ्लॅट आहे. भरत जैन यांची ठाण्यात दोन दुकाने आहेत. त्यामुळे मासिक भाडे 30,000 रुपये आहे. भरत जैन अनेकदा छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा आझाद मैदान यांसारख्या प्रमुख ठिकाणी भीक मागताना दिसतात. त्याची कथा ही त्याच्या उद्योजकतेची आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

थंडीत Heart Attack चा सर्वाधिक धोका; ‘या’ चूका करू नका 

Manoj Jarange | ‘या’ बड्या नेत्याचा सल्ला मनोज जरांगेंना मान्य!

‘जातीयवादी पिलावळ आरक्षण…’; पडळकरांची जरांगेंवर टीका

Gold Rate | सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा आजचे दर

अभिनेत्री Aishwarya Rai ने केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ