‘जातीयवादी पिलावळ आरक्षण…’; पडळकरांची जरांगेंवर टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) समाजानंतर धनगर समाजही आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मनोज जरांगे-पाटलांवर (Manoj Jarange Patil) अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. पडळकरांनी जरांगेंना जातीयवादी पिलावळ म्हटलंय.

जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नावही घेण्यास तयार नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी जरांगे-पाटलांना लक्ष्य केलं आहे. धनगर आरक्षणासाठी न्यायालय, रस्त्यावर लढाई सुरू असतानाच सरकारकडेही पाठपुरावा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आम्हाला आरक्षण दिलं होतं, असं पडळकर म्हणालेत.

काही पुरोगामी नेत्यांनी जातीयवादी पिलावळ तयार केल्या आहेत. ही पिलावळ आरक्षण मागत आहे. पण, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सन्मान करत नाहीत. अथवा बाबासाहेबांचं नावंही घेण्यास तयार नाही. मात्र, यांना आरक्षण पाहिजे. असं कसं चालेल?, असा सवाल गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) उपस्थित केलाय.

70 वर्षे आमच्यावर अन्याय केला गेला. अनेकजण आयएसएस, आमदार, खासदार झाले असते. पण, यापासून आम्ही मुकलो आहोत. आता आमची एकजूट झाली आहे, असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय.

पडळकरांच्या टीकेले जरांगेंचं प्रत्युत्तर

पडळकरांना जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो. ते काहाही बोलतात. त्यांनी पाहिलं नसेल, पण मी ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाचं दर्शन घेतो. महाडला देखील मी जाऊन आलोय, असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘धनंजय मुंडे माझ्या कानात म्हणाले की…’; जरांगे पाटलांकडून मोठा खुलासा

अदानींसाठी मोठी गुड न्यूज; कंपनीला पुन्हा आले अच्छे दिन

Health | मुलांना ‘या’ रोगाचा धोका; WHO ने दिली चिंताजनक माहिती

संजय राऊतांकडून भाजपच्या बड्या नेताचा Video ट्विट; राजकारणात खळबळ

Instagram Update | आता डायरेक्ट डाऊनलोड करता येणार Reels, पाहा कसे