‘धनंजय मुंडे माझ्या कानात म्हणाले की…’; जरांगे पाटलांकडून मोठा खुलासा

मुंबई | मराठा आंदोलक (Maratha Protest) मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणामुळे (Maratha Reservation) चर्चेचा विषय ठरत आहेत. आमरण उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यभर दौरा करणार असल्याचं म्हटलं आहे.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane), सातारा (Satara) कल्याण (Kalyan) अशा अनेक ठिकाणी जाऊन मराठा आरक्षणाविषयी जाहीर सभा (Rally) घेत आहेत. जरांगे पाटील यांच्या सभेला मराठा बांधवांचा चांगला पाठींबा मिळत आहे. दरम्यान जरांगेंनी एका मुलाखतीत (Manoj Jarange Patil Interview) बोलत असताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मनोज जरांगे पाटील यांना एका मुलाखतीत मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) तुम्हाला भेटले तेव्हा आरक्षण दिलं नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा (Resign) देणार असं म्हणाले होते का असा प्रश्न विचारला? त्यावर जरांगे पाटील म्हणाले की, मुंडेंनी त्यांची सविस्तर भूमिका मांडली. “ते तरी कुठे खोटं बोलतात, त्यांना तुम्ही विचारुन बघा. कानात काही कशाला बोलतील, लांब होते.

आता मी कुणाला कानात बोलूच देत नाही. ते बोलले ते बऱ्याच जणांना ऐकूही आलं. पण ठीक आहे. ते एकदा शब्द दिल्यावर तेही बदलत नाहीत. त्यांची तितकी ख्याती आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. “सरकारच्या शिष्टमंडळाने आरक्षण दिलं जाईल, असं सांगितलं आहे. त्यांनी लेखी आरक्षण दिलं जाईल, असं सांगितलं आहे”, असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे यांनी सरकारला (Government) 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यामुळे 24 डिसेंबरपर्यंत (December) आश्वासनाची पूर्तता नाही झाली तर पुढे काय? असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडलीये.

थोडक्यात बातम्या –

संजय राऊतांकडून भाजपच्या बड्या नेताचा Video ट्विट; राजकारणात खळबळ