संजय राऊतांकडून भाजपच्या बड्या नेताचा Video ट्विट; राजकारणात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कायम वादग्रस्त वक्तव्य किंवा विरोधीपक्ष नेत्यांवर टीका करताना दिसत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप (BJP leader) नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे मकाऊमधील एकून 27 फोटोज तूफान व्हायरल झाले होते.

संजय राऊत यांनी त्या फोटोज (Makau Photos) वरुन भाजप आणि बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी राऊतांनी केलेल्या टीकेवर बोलत मौन सोडलं. मात्र राऊत यांनी या विषयाचा आणखी बाव करत बावनकुळेंना डिवचलं. बावनकुळे आणि राऊत यांच्यात जुंपली. दरम्यान राऊत यांनी त्यांच्या अधिकृत X अकाउंटवरुन (X Account) नवीन व्हिडीओ शेअर केला.

राऊतांनी कोणता व्हिडीओ शेअर केला?

संजय राऊत यांच्याकडून बावनकुळे यांचा आणखी एक मकाऊमधील व्हिडीओ (Video) ट्वीट (Tweet) करण्यात आलाय. इतकंच नाही तर मकाऊ की राते. पिक्चर अभी बाकी है.. असं कॅप्शन (Caption) त्या व्हिडीओला देण्यात आलं असून चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राऊतांनी ट्वीट करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी साडेतीन कोटी रूपये उडवल्याचा आरोप केला होता. तर माझ्याकडे आणखी 27 फोटो आणि 5 व्हिडीओ असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला होता.

काही दिवसांपूर्वी राऊतांनी सामनाच्या (Saamna) आग्रलेखातून देखील बावनकुळेंवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, बुंद से गयी वो… या मथळ्याखाली अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला होता. भाजपचे कुळे यांची ‘मुळे’ मकाऊच्या कॅसिनो (Kasino) महालात पोहोचली. याचे समर्थन आज भाजपचे दुधखुळे करत आहेत.

मकाऊच्या कुळ्यांची पाठराखण करण्यासाठी इतरांवर बदनामीचे शेण उडवून धमक्या वगैरे दिल्या जात आहेत. पण भाऊ एक मात्र नक्की, या लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा (Maharashtra Political) मकाऊछाप जुगार करून राज्य बदनाम केलं आहे, असा आरोप राऊतांनी सामनातून केला होता.

 

 

थोडक्यात बातम्या-

Crime News | मुंबई हादरली! चक्क नशेसाठी दाम्पत्यानं केलं ‘हे’ भयानक कृत्य